Manwath Murders Web Series : ११ खून करून सुद्धा आरोपी निर्दोष सुटले त्या मानवत हत्याकांडाची गोष्ट
1972 चा काळ, परभणी जिल्ह्या पाथरी तालुक्यातलं मानवत गाव. त्या मानवतमध्ये नगरपरिषदेचं अध्यक्षपद भूषवलेला उत्तमराव बारहाते नावाचा गर्भ श्रीमंत व्यक्ती राहायचा. पैसा असल्यामुळं त्याला गावात भयाण मान होता. एक दिवस त्याची नजर पडली गावातल्या पारधी वस्तीवरील रुक्मिणी नावाच्या महिलेवर. त्याला रुक्मिणी आवडली. रुक्मिणीचा हातभट्टीची दारू काढायचा धंदा होता. उत्तमरावानं तिला आपल्या वाड्यात राहायला आणली आणि तिच्यासाठी नवीन वाडा सुद्धा बांधला. रुक्मिणीनं तिथं ही हातभट्टीचा धंदा सुरू केला. धंदा व्यवस्थित चालू होता पण बराच काळ गेला तरी रुक्मिणीच्या पोटी पोर काय जन्माला आलं नाही. त्यासाठी पुढं ती गणपत सावळे नावाच्या मांत्रिकाच्या आहारी गेली. मांत्रिक गणपतनं तिला तुझ्या वाड्यासमोरील पिंपळाच्या झाडावर मुंज्या राहत असल्याचं सांहितलं. त्या मुंज्याला सुंदर मुली आवडतात आणि तू त्या मुंज्याची इच्छा पूर्ण केलीस. त्याला बळी चढवलेस तर तुला गर्भ राहिल, तुला पोरं होतील असं त्या मांत्रिकानं रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं. मग त्यानंतर पोरासाठी बेभान झालेल्या रुक्मिणीनं मानवतमध्ये अक्षरशः रक्तांचा सडा पाडला. त्यादिवसापासून मानवतमध्ये सुरू झाला अंधश्रद्धेतून क्रुरतेचं टोक गाठलेला चित्त थरारक खेळ ज्यामध्ये एका मागून एक ११ जणांची हत्या झाली अन मानवतसकट देश हादरून गेला. पुढं खुद्द शरद पवार यांनी त्याप्रकरणी लक्ष घालून विधानसभेत मुद्दा मांडला आणि CID टीम मानवतमध्ये पाठवली. पुढं मग त्या पोलीस अधिकाऱ्यानं कसा मानवत हत्याकांडाच्या गूढ केसचा गुंता सोडवला त्याची स्टोरी सिनेमा किंवा वेबसिरीजला लाजवेल अशी आहे. नुकतच सोनी लिव्हनं या हत्याकांडावर आधारित मानवत मर्डर्स नावाच्या सस्पेंस थ्रीलर वेबसिरीजचा टिजर लॉन्च केला आणि पुन्हा एकदा ती केस चर्चेत आली, नेमकं काय घडलं होतं तेव्हा त्याचीचं ही सगळी गोष्ट....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#manwathwebseries
#manwathseries
#manwathwebseriestrailer
#manwatwebseriestrailer
#vishaychbhari
#विषयचभारी
Негізгі бет Manwath Murders Web Series : ११ खून करून सुद्धा आरोपी निर्दोष सुटले त्या मानवत हत्याकांडाची गोष्ट
Пікірлер: 92