Ganga art
Kothali.
Ta Omerga Dist Osmanabad
👉 Like us on facebook
/ jamadar.gangandhar
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक हे नाव लोकांना फारसं परिचित नाही. इतिहासातील हे शूर आणि लढवय्या व्यक्तिमत्व इतिहासाच्याच अज्ञात युगात कोठेतरी हरवून बसलं, पण जेव्हा कधी आपण भारताच्या इतिहासाची पाने उलटतो तेव्हा इतिहासाच्या त्याच अंधाऱ्या युगातून या थोर व्यक्तिमत्त्वाच्या शौर्याचे सोनेरी कवडसे आपल्याला साद घालीत असतात, आपल्याला खुणावीत असतात.
आपल्याला जवळ बोलावून उमाजी नाईक नामक त्या रांगड्या मराठी वीराची गाथा सांगण्यासाठी आसुसलेले असतात…!
प्रजेला प्रमाण मानून त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपली लढाई सुरु ठेवली. परंतु १८१८ मध्ये ते इंग्रजांच्या हाती सापडले आणि त्यांना १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला.
या काळात त्यांनी तुरुंगातून सुटल्यावर काय करायचे याची आखणी केली आणि बाहेर पडल्यावर आपला लढा अधिकच तीव्र केला. एव्हाना लोक देखील उमाजींच्या बाजूने उभे राहिले होते.
दिनांक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी उमाजींनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिल्रे. इतर कोणीही पुन्हा कधीही इंग्रजांच्या वाट्याला जाऊ नये व लोकांच्या मनात आपली जरब बसावी म्हणून इंग्रजांनी सलग तीन दिवस कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला उमाजींचे प्रेत लटकावून ठेवले होते. पण इंग्रज त्यांनी पेटवलेली बंडाची आग काही शमवू शकले नाहीत आणि पुढे जे काही घडले तो इतिहास तुम्हाला ठावूक आहेच!
उमाजी नाईक यांची हीच शौर्यगाथा त्यांना आद्यक्रांतीकारकाची उपाधी देऊन गेली. खुद्द इंग्रज अधिकारीही त्यांच्या शौर्याचे कौतुक करून गेले आहेत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे -
उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?
तर उमाजींना पकडणारा मॉकिन टॉस म्हणतो -
उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.
उमाजी नाईक नामक महाराष्ट्राच्या या थोर क्रांतीपर्वाला मानाचा मुजरा !
Негізгі бет New Raje Umaji Naik full hd video song 1080p 2020 विर उमाजीच्या तलवारीनं कुळ सुधारल MP3 song
Пікірлер: 41