#BolBhidu #ParisOlympics2024 #PRSreejesh
२०१७ मध्ये त्याला ACL इंज्युरी झाली, वयाच्या ३० व्या वर्षीच त्याचं करिअर संपणार का अशी चर्चा झाली, पण हा पुन्हा उभा राहिला, डोक्यावर हेल्मेट, पायात पॅड आणि हातात स्टिक घेऊन, हॉकीच्या मैदानावरची भिंत बनून. त्याचं नाव पीआर श्रीजेश. भारताच्या हॉकी टीमचा गोलकीपर. याच्या नावातल्या पीआर अक्षरांचा एक फुलफॉर्म पराट्टू रवींद्रन आणि दुसरा फुलफॉर्म पक्का रोकेगा. पहिला फुलफॉर्म त्याला जन्मानं मिळाला आणि दुसरा त्यानं कष्टानं मिळवला.
भारताच्या हॉकी टीमनं सलग दुसऱ्या ऑलिंपिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं, मॅच जिंकल्यावर सगळे कॅमेरे पीआर श्रीजेशवर शिफ्ट झाले, श्रीजेश गोलपोस्टवर जाऊन बसला दोन्ही हात उंचावले, ओरडला आणि हसला, या हसण्यामागं फक्त ६०-७० मिनिटांचे, एका मॅचचे कष्ट नव्हते, १८ वर्षांचे कष्ट होते, इंज्युरीतून उभं राहण्याची जिद्द होती आणि आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच जिंकवण्याचं समाधानही. पण पीआर श्रीजेश घडला कसा ? लढला कसा ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Olympics 2024 Hockey मध्ये Team India Bronze Medal जिंकली, गोलकिपर PR Sreejesh ची स्टोरी काय ?
Пікірлер: 109