शेलापिंपळ गाव कडून आळंदी कडे येतं असताना रस्त्याने वडगाव घेनंद येथील छोटासा घाट चढून आल्यानंतर आळंदी रस्त्यावर पांडवकालीन मंदीर अशि पाटी लावलेली दिसले कुतुहुल म्हणून गाडी वळवली. सुरुवातील ज्ञानोबा महाराजांचे पादुका समाधी असून तिथूनच एक कच्चा रस्ता आत डोंगरावर जंगलात गेला होता. पादुकांचे दर्शन घेउन कच्या रस्त्याने गाडी धावू लागली आजूबाजूला हिरवी गार झाडे,मोरांचे व इतर पक्ष्याचे कानावर पडणारे सुमधून आवाज, नयनरम्य परिसर यातून पुढे पुढें येतं असताना मनाला प्रसन्न वाटू लागले. दगड धोंद्यावरून आदळत आपटत स्कूटी जात असताना वनराई मधून येणारे पंक्ष्यांचे कर्ण मधुर आवाज मंत्रमुग्ध करत होतो.. पुढे आल्यानंतर समोर महादेव मंदिर अशी पाटी पाहून उजवी कडे वळलो..जसे जसे पुढे जाईल तसे परिसर अधिक सुंदर दिसू लागला.. शेवटी मंदिराची कमान दिसली तिथे गाडी लावून पायऱ्यांनी खाली उतरू लागलो. निर्जन परिसर आणि मनाला वेड लावणारी शांतता यात फक्त स्वतःच्याच पावलांचा आवाज कानी पडत होता, मंदिराचा कळस दिसू लागला तेव्हां हळु हळु पायऱ्या उतरत मंदिरापर्यंत पोहचलो आणि अतिशय सुन्दर परिसर समोर दिसला एका बाजूला महादेव मंदीर पूर्वेकडे तोंड असलेले महादेव मंदीर, मदिरा समोरच एक छोटासा तलाव. सभामंडप मधून आत गाभाऱ्यात गेल्या नंतर छान असे शिवलिंग असून .. भिंतीवर महादेवाची तस्वीर व ज्ञानेश्र्वर महाराजांची तस्वीर आहे दर्शन घेउन बाहेर पडताच झाडावरून दिसणाऱ्या खारू ताई मागे लक्ष जाताच एक विहंगम असे दृश्य दिसले.. या ठिकाणी वना मध्ये अनेक दगड शेजारी ठेवून ओम आकार बनवला असून अतिशय सुन्दर आहे.
#पांडवकालीन मंदीर वडगाव घेंनद
द#स्पर्श_शब्दांचे_पान_कवितांचे_कवितांचे🍂
Негізгі бет पांडवकालीन महादेव मंदीर, वडगाव घेनांद
Пікірлер