पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, प्रमुख अतिथी सीडीएससीओ, सीपोर्ट, चेन्नई, आरोग्य सेवा महासंचालनालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचे सहाय्यक औषध नियंत्रक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन जाधव, आरअँडडी, एनडीडीएस भारत सिरम अँड वॅक्सिनेशन लिमिटेड पुणे चे सहाय्यक उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ सुनिल पांडे, मंडळाचे संचालक रमाकांतभाई पाटील, संचालक अॅड. राजेश कुलकर्णी, संचालक दीपकभाई पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, डॉ निलेश पाटील, सौ. श्वेतांबरी जाधव, समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटील, प्राचार्य डॉ. एस.पी. पवार, प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, प्राचार्य डॉ एन.जे. पाटील, प्राचार्य प्रा.बी. के. सोनी, प्राचार्य प्रा. आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांनी वर्षभराचा शैक्षणिक अहवाल सादर केला. तर क्रीडा विभागप्रमुख प्रा. हितेंद्र चौधरी, प्रा. चेतन पाटील यांनी क्रीडा विभागाचा अहवालाचे वाचन केले. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. दिवाकर पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
#Psgvpm
#Psgvpmcollegeofpharmacy
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न... |
Негізгі бет •पू.सा.गु.वि.प्र.मं.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न•
Пікірлер