नाशिक शहरातील एक उपनगर. तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेले एक धार्मिक स्थान. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. हे स्थळ गोदावरी या नदीच्या किनारी आहे. येथे सध्या सीता गुंफा व पेशवे यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे कोरीव दगडात कलाकुसर असलेले स्थान ही पाहण्याची खास स्थळे आहेत.
नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदिरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.
Негізгі бет पंचवटी
Пікірлер: 1