सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित बालक मंदिर इ.५वी ते ७वी मराठी माध्यमात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील सोमवार दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांची शाडूमातीचा गणपती बनविणे ही कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना श्रद्धेबरोबरच पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बनविण्याचे महत्व समजावे तसेच स्वनिर्मितीचा आनंद मिळावा हा या मागचा उद्देश होता.
दरवर्षी विद्यार्थी व शिक्षक यांची एकत्रित शाडूमातीचा गणपती तयार करणे ही कार्यशाळा घेतली जाते आणि त्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना गणेशोत्सवाला प्रत्येकाच्या घरी करण्यात येते. सर्वजण या कार्यशाळेत मोठ्या उत्साहाने व आनंदाने सहभाग घेतात, आणि या कार्यशाळेपासूनच विद्यार्थ्यांना शाळेतील गणेशोत्सवाचे वेध लागतात.
यावर्षी देखील बालक मंदिर या शाळेने पर्यावरणाला पूरक असा उपक्रम म्हणून ही कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडूमातीचे गणपती मोठ्या उत्साहाने बनविले. ही कार्यशाळा चित्रकला शिक्षिका सौ.सुनयना आंबेकर यांनी घेतली. गणपती बनवतांना माती भिजवण्यापासून ते प्रत्येक आकार बनवण्याविषयी उत्तम मार्गदर्शन करत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांकडून गणपती बनवून घेतले. प्रत्येक विद्यार्थी मनापासून व तन्मयतेने करतांना दिसत होता.
या कार्यशाळेची निर्मिती संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील यांची असून शालेय समिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा मोठ्या आनंदाने व उत्साहाने पार पडली.
Негізгі бет पर्यावरणपूरक शाडू मातीचा गणपती कार्यशाळा
Пікірлер