पावनखिंड
नाही सुटणार एकही गनिम
घोडखिंडीतुन या वरती
’शब्द‘ दिला माझ्या राजाला
आता प्राणाची शिकस्ती
खुशाल जावा राजं तुम्ही
अन् द्या तोफांना त्या बत्ती
एक माझा मावळा
लढेल हजाराशी
एक पाउल पुढे सरकेल गनिम
खबरदार गाठ माझ्या समशेरीशी
हजार घाव करतील गनिम
ढाल माझी निधडी छाती,
नाही हलनार तसुभर तरीही,
माझ राज अजुन वाटेवरती ...
होतील वार हजार
या देहावरती
तुटतील धमन्या, शिराही
संपेल शरीरातले रक्त ..... तरीही
तेव्हा देह पडेल हा आडवा
निष्प्राण होवुन या रणभुमीवरती
ढेचाळतील घोडे गनिमाचे
काही क्षण तरीही
तरीही धन्य झालो
तो क्षण भेटेल माझ्या राजांला
पुढे पुढे जायाला ...
पुढे पुढे जायाला ...
’शब्द‘ दिला माझ्या राजाला
आता प्राणाची शिकस्ती
खुशाल जावा राजं तुम्ही
अन् द्या तोफांना त्या बत्ती
द्या तोफांना त्या बत्ती ...
Негізгі бет Pavankhind : पावनखिंड
Пікірлер: 2,6 М.