स्वर्ग सुखाची खाण आमचे हे कोकण
शक्ती - तुरा
जाकडी, बाल्या नाच अशा नावाने ओळखली जाणारी कोकणातील पारंपरिक लोक कला शक्ती तुरा. नारळी पौर्णिमा ते दसऱ्या पर्यंत ही चालते. प्रगती नृत्य कला पथक पाभरे गावठण वाडी गुहागर या संचा मध्ये वाडीतील सर्वच मुल भाग घेतात. पण डबल बारीला फक्त आठ जन नाचतात ते पण निट नाचणारे. नारळी पौर्णिमा नारळ फोडला की रेसल ला सुरवात होते. वाडीतील वडीलदारी मंडळी मोठ्या हौसेने ही कला मुलांना शिकवत असत आपली शेतीची कामे आटपुन रात्री रेसल घ्यायची. अस करत करत मुल १० ला गेली की नवीन मुलांना शिकवायचे अस चालु असायची. पण आता हे सर्वच जमत नाही पण कला आजुन ठिकवून ठेवली आहे. मग तरुण आसो वा वयस्कर.
म्हणून या वर्षी आम्ही एकाच रंगमंचावर एकाच वेळी ५ बारीची मुल म्हणजे ४० कलाकारांचा संच घेऊन नाच केला. आमची मुल मुंबईत जरी राहीली तर सुध्दा गावी गेल्यावर ही कला आणि नाच मोठ्या आवडीने नाचतात. येत नाही ते शिकतात.
असा हा आमचा प्रगती नृत्य कला पथक पाभरे गावठण वाडी गुहागर यांचा आगळा वेगळा प्रयत्न.
#shaktitura2024 #konkan #guhagar
Негізгі бет प्रगती नृत्य कला पथक पाभरे गावठणवाडी गुहागर एकाच वेळी ४० कलाकारांचा संच || जबरदस्त एन्ट्री ||
Пікірлер: 15