२०२२ च्या मे महिन्यात स्वा. सावरकर यांनी लिहिलेल्या आणि वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांची स्पर्धा बाल व युवा वयोगटांत घेण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि कलांगण या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने ही राज्यव्यापी स्पर्धा घेण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळालेली अशी ही स्पर्धा!
दोन्ही गटातून प्रेक्षक आणि परीक्षक पसंतीचे पारितोषिक असलेल्या स्पर्धकास स्मारक आणि कलांगण कडून स्वतःचे गाणे बक्षीस मिळणार होते.... आणि हे पारितोषिक पटकावले मुंबईच्या त्या वेळी वय वर्षे 10 असलेल्या स्मयन आंबेकर याने......
या गाण्याला संगीतबद्ध केले आहे वर्षा भावे यांनी आणि संगीत संयोजन आहे सोमेश नार्वेकर यांचे...हे गीत सावरकर आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने
२६ फेब्रुवारी (२०२४)
आज प्रकाशित करीत आहोत.
समूहस्वर आहे,
मृणाल जवंजाळ,
स्वरा पाटील,
रुद्रा बांदेकर , इरा भिडे,
दुर्वा नाडकर्णी,
वेदांथ धामगावकर, वेदांत यादव, श्लोक भंडारे, निया धुरू यांचा!
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मंजिरी मराठे आणि रणजित सावरकर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.
प्रियकर हिंदुस्थान
गीत : वि. दा. सावरकर
संगीत : वर्षा भावे
स्वर संयोजन :
सोमेश नार्वेकर
व्हिडीओ संकलन
रोहन गायतोंडे
सकल जगामधी छान
आमुचे प्रियकर हिंदुस्थान
केवळ पंचप्राण आमुचे
प्रियकर हिंदुस्थान||
बहुत पाहिले बहुत ऐकिले
देश परी ते सान
सान मिसर पाताल आंग्लभू
सान चीन जापान ||
बहुत गिरी परी तुझाच
गिरीवर हिमालयाचा मान
कवण नदी दे श्री गंगेसम
पूत सुधा जल पान ||
कस्तुरीमृग परिमल पूरित
जिचे फुलावे रान
प्रभातकाली कोकिल
किलकिल कुजित आम्रोद्यान ||
यज्ञ धूम सौगंध मनोहर
जिचे सामरव गान
ऐकुनी येती जिथे कराया
देव सोमरस पान ||
जिजा जन्म दे शिवा,
जिच्यास्तव गुरु पुत्राचे प्राण
जिच्यास्तवचि त्या कुमारिकांसी
विस्तवात ये न्हाण ||
जननी तुझ्या सन्मानरक्षणी
अर्पू रणी हे प्राण
शत्रूकंठ भंगोनी घालू तुज
दारुण रक्त स्नान ||
Негізгі бет प्रियकर हिंदुस्थान | Priyakar Hindustan | Swatantryaveer Savarkar | Varsha Bhave
Пікірлер: 20