पुण्यातील 8 झपाटलेली ठिकाणे || 8 haunted places in Pune (Marathi)
पुण्यातील 8 झपाटलेली ठिकाणे
1. पुण्यातील “चंदन नगर”मध्ये मध्यरात्री “हातात बाहुली घेऊन जाणारी लहान मुलगी” अनेकांना दिसली आहे. चंदन नगरमध्ये एका इमारतीचे बांधकाम चालू असताना झालेल्या अपघातात ही मुलगी मृत्युमुखी पडल्याचं लोक सांगतात.
2. काही वर्षांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता त्यात अनेक बालके मृत्युमुखी पडली याच बालकांचा आवाज दरीतून येतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सिंहगड किल्ल्याच्या एका दरीतून हा लहान मुलांचा आवाज येतो. अनेक लोक weekend साजरा करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर जातात. मात्र या दरीकडे कोणीही फिरकत नाही.
3. शनिवारवाडा : शनिवारवाड्यात रात्रीच्या वेळी “काका, मला वाचवा!” असा आवाज अनेकांनी ऐकला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी नारायणराव यांची हत्या त्यांचे काका राघोबा यांचे करवी शनिवारवाड्यात करण्यात आली. म्हणूनच शनिवारवाड्याची ओळख पुणे शहरातील एक झपाटलेले ठिकाण अशी आहे. दिवसा अनेक पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात, मात्र रात्री 8 नंतर शनिवारवाडा खुला ठेवण्यात येत नाही. रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास कोणीही धजावत नाही.
4. खडकी युद्ध दफनभूमी : या दफनभूमीत रात्रीच्या वेळी “सैनिकांच्या ओरडण्याचा आवाज” येतो. दिवसा ही दफनभूमी अतिशय सुंदर दिसते. मात्र रात्री इथे कुणीही थांबत नाही.
5. पुण्यातील एमजी रोडवर “haunted house” नावाचे पडके घर आहे. इथे एका मुलीची निर्घृण हत्या झाली होती, असे म्हणतात. रात्रीच्या वेळी या “haunted house” जवळ जाण्याची हिंमत कुणातही नाही.
6. पुण्यामध्ये कॅम्प परिसरात व्हिक्टरी थिएटर आहे. या थिएटरमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सगळे प्रेक्षक बाहेर पडतात... आणि त्यांनंतर काही काळ या थिएटर मध्ये “भयंकर हसण्याचा आवाज” येतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
7. पुण्यातील “होळकर पुला”वरून रात्रीच्या वेळी कसलीही वाहतूक होत नाही. अठराव्या शतकात बांधलेला हा पूल आजही उत्तम स्थितीत आहे, मात्र रात्रीच्या वेळी या पुलावर भयंकर अनुभव आल्याचे लोक सांगतात. अनेक अपघात या पुलावर झाले असून अनेकांचा जीवही गेला आहे.
8. विमान नगर ते सिंबायोसिस कॉलेज हा रस्ता अमावस्येच्या रात्री अत्यंत भीतीदायक भासतो. अमावस्येला किंवा अंधारलेल्या रात्री या रस्त्याने न जाण्याचा सल्ला येथील स्थानिक लोक देतात.
माहिती आवडली तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
THANK YOU
Disclaimer : या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही इंटरनेट व इतर स्त्रोतांद्वारे संकलित केलेली असून याद्वारे कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा ओन्ली मराठी चॅनलचा मानस नाही.
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль पुण्यातील 8 झपाटलेली ठिकाणे || 8 haunted places in Pune (Marathi)
Пікірлер: 21