#BolBhidu #RajThackeray #MNS
काहीही झालं तरी मला मनसेची लोकं सत्तेत बसवायची आहेत, असा निर्धार राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राज्यभर सक्रीय देखील झालेत. त्यांनी अलीकडेच मराठवाड्याचा दौरा केला. आता ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते ज्या ज्या मतदारसंघात जात आहेत, तिथे उमेदवारांची चाचपणी करतायत. तसेच काही ठिकाणी थेट उमेदवारी जाहीर करतायत. आतापर्यंत राज ठाकरे यांनी एकूण सात ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरेंचा हा आक्रमक पवित्रा पाहता, ते यंदा २००९ चा परफॉर्मन्स रिपीट करू शकतील, अशा चर्चा सुरू झाल्यात.
२००९ च्या विधानसभेला राज ठाकरे यांनी १३ आमदार निवडून आणले होते. त्यानंतर त्यांना अशी कामगिरी रिपीट करता आली नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना प्रत्येकी एकच आमदार निवडून आणता आला. पण आता विधानसभेला ३ महिन्याचा अवधी बाकी असताना ते फॉर्ममध्ये आलेत. विविध मतदारसंघात उमेदवार जाहीर करतायत. पण खरंच त्यांना २००९ चा परफॉर्मन्स रिपीट करता येईल का? त्यांच्यासाठी राजकीय परिस्थिती नक्की कशी असेल? कोणते मुद्दे पथ्यावर पडू शकतात? कोणते मुद्दे बॅकफूटला घेऊन जाऊ शकतात पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Raj Thackeray यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी, विधानसभा निवडणुकीत २००९ चा परफॉर्मन्स रिपीट करणार ?
Пікірлер: 686