सांगा कसं जगायचं? मराठी कविता | कवी: मंगेश पाडगांवकर | Motivational Marathi Kavita On Life | Sanga Kas Jagayach Marathi Kavita | Mangesh Padgaonkar
कविता वाचन: नंदकुमार माने
कवी: मंगेश पाडगांवकर
Video Editing: NK Creative
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!
कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!
पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
__ मंगेश पाडगांवकर
जर तुम्हाला तुमची कविता आणि तुमचा आवाज आमच्या चॅनेलवर टाकण्याची इच्छा असेल तर आम्हाला पुढे दिलेल्या ई-मेल: itsme.nk1990@gmail.com किंवा आमच्या मोबाईल नंबर: +91 8108991630 वर संपर्क करावा.
जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला subscribe, like, share, comment आणि तुमच्या व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये ऍड करायला विसरू नका.
आमच्या कवितांचा असाच आनंद घेत रहा आणि आमच्या सोबत कनेक्टेड रहा.
जर तुम्हाला आमच्या कविता आवडतं असतील तर तुमच्या social sites वर आमच्या कविता share करत रहा facebook | twitter | google+ | whatsapp ज्याने करून आमच्या कवितेचा आनंद वेगवेगळ्या कविता रसिकानला घेता येईल.
❖❖❖❖❖ आमची कविता पहिल्या बदल धन्यवाद ❖❖❖❖❖
#sangakasjagyacha #mangeshpadgaonkar #marathikavita #famousmarathikavita #marathiquote #inspirationalmarathipoem #marathi #kavita #quote #marathipoem #nkcreative #nandkumarmane #famouspoet #inspirationalpoem #motivationalpoem #motivationalkavita #inspirational
Негізгі бет सांगा कसं जगायचं? मराठी कविता | कवी: मंगेश पाडगांवकर | Motivational Marathi Kavita | Marathi Kavita
Пікірлер: 3