सबसे कातील, गौतमी पाटील पुढे अभिनेत्रीही फिक्या; एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा चक्रावणारा
कार्यक्रमाच्या घेता येईल तेवढ्या सुपाऱ्या कमीच असतात. लोकांची प्रचंड मागणी आणि तारखाच नसल्याने गौतमी पाटीलला आपल्या गावात कार्यक्रमाला आणण्यासाठी सांगेल तितकं मानधन द्यायला लोक तयार असतात.
घायाळ करणाऱ्या अदा आणि ठुमके, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हातोटी आणि वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत साधेपणाची राहणी यामुळे प्रसिद्ध नृत्यांगणा अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. कधी काळी ऑर्केस्ट्रात अदाकारा म्हणून काम करणारी… बॅकस्टेज असलेली गौतमी पाटील आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. कारण गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या तारखा जशा मिळणं मुश्किल आहे, तसंच काहीसं गौतमी पाटीलचं आहे. गौतमी पाटीलच्याही तारखा मिळणं मुश्किल असतं. कारण तिच्या महिन्याच्या सर्व तारखा बुक असतात. कार्यक्रमाच्या घेता येईल तेवढ्या सुपाऱ्या कमीच असतात. लोकांची प्रचंड मागणी आणि तारखाच नसल्याने गौतमी पाटीलला आपल्या गावात कार्यक्रमाला आणण्यासाठी सांगेल तितकं मानधन द्यायला लोक तयार असतात. पण तरीही तारखाच शिल्लक नसतात त्यामुळे गौतमीला अनेक कार्यक्रमांच्या तारखा पुढच्या महिन्याच्या द्यावा लागत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पुणे, कोल्हापुरात सर्वाधिक कार्यक्रम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमी सध्या एका कार्यक्रमाचे दीड ते 2 लाख रुपये मानधन घेते. तिचा दहा बारा जणांचा लवाजमा असतो. या सर्वांमध्ये मानधनाचं वाटप केल्यानंतरही गौतमी महिन्याला 30 ते 35 लाख रुपये सहज कमावते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत. गौतमी खानदेशातील असूनही पुणे आणि कोल्हापुरात तिचा चाहता वर्ग अधिक आहे हे विशेष.
अश्लीलतेचा ठपका
दरम्यान, सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची तिच्यावर टीका झाली होती. तिलाही टीकेत तथ्य वाटल्याने तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबली नाही आणि थांबताना दिसत नाही.
त्या व्हिडीओमुळे हादरली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ काढून व्हायरल केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गौतमी चांगलीच हादरून गेली. या प्रकरणी तिने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
[11:24, 10/03/2023] Satish Jadhav 🎥: गौतमी पाटीलचा बेडरुममधील 'तो' व्हिडिओ समोर; पाहून तुमच्याही भुवया उंचावतील
आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर गौतमीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. मात्र अनेकदा ती तिच्या डान्स व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते
आपल्या अदाकारीने सगळ्यांना घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil Dance Video) एक प्रायव्हेट व्हिडीओ (Viral Video) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर राज्य महिला आयोगानं यावर गंभीर दखल घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना दिले होते. कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यात चांगलच तापलं होतं.
आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर गौतमीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. नुकताच गौतमीचा एक बेडरुममधील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौतमी जिसे हसना रोना है वो प्यार करे या गाण्यावर रिल्स शूट करताना दिसत आहे.
गौतमीने तिचा हा व्हिडिओ बेडरुममध्ये शूट केला आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.गौतमी एखादी पोस्ट शेअर केली ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच गौतमीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर देखील शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी देखील यावरुन गौतमीची कानउघाडणी केली होती. राष्ट्रविकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
गौतमीच्या एका स्टेज शोच्या वेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्टेजशोच्या वेळी गौतमी कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला. हा व्हडिओ फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला होता. हा व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
Негізгі бет सबसे कातील, गौतमी पाटील पुढे अभिनेत्रीही फिक्या एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा चक्रावणारा
Пікірлер