#shivneri #shivnerikilla #marathimulga #vlog #मराठीमुलगा #शिवनेरीकिल्ला
#शिवनेरीकिल्लाजुन्नर #शिवभक्त #सह्याद्री
============================================================
मित्रांनो....हा माझा पहिला vlog : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ला ,जुन्नर या पावन किल्याचा आहे..❤️🚩
आज भेट देत आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याला. आज हा किल्ला पाहणार आहोत. सोबतच या किल्ल्याची माहिती देखील घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला अजूनही तेवढाच भक्कम आहे 🙌🚩
१६ फेब्रुवारी १९३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला. १६२९ मध्ये आई जिजाऊ गरोदर असताना शहाजी राजेंनी जिजाऊ ना शिवनेरी किल्ल्यावर आणले, याच किल्ल्यावर आणण्याचे कारण म्हणजे किल्ल्याची चहूबाजूंनी असलेली भक्कम तटबंदी. आई जिजाऊ च्या संरक्षणासाठी शाहजीराजे भोसलेंना हा किल्ला सुरक्षित वाटला. आज पण हा किल्ला सुस्तीतीत आहे, हे किल्ला पाहिल्यावर लक्ष्यात येते. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. याच शिवाई देवीला आई जिजाऊंनी नवस केला कि, जर मला मुलगा झाला तर त्याचे नाव तुझ्या नावाप्रमाणे ठेवील आणि त्या नवसाला शिवाई देवी पावलीहि. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी आई जिजाऊंना पुत्र प्राप्ती झाली, आणि नवसाप्रमाणे आई जिजाऊंनी पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले. जुन्नर बस स्टॅन्ड जवळील रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जुन्नर गाव ते किल्ला असे ४-५ किमी अंतर आहे. जुन्नर गावातून त्या ठिकाणी जाण्यासाठी ऑटो वगैरे ची मदत घेऊ शकता. किल्ल्यावर असलेले भक्कम दरवाजे आजही किल्ल्याच्या सुरक्षेतेची साक्ष देतात. काही दरवाजे खराब होत आहेत पण त्यांच्या दुरुस्तीची कामेही तेवढीच बारकाईने होत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो त्यामुळे चढण्यासाठी जास्त त्रास होत नाही. किल्ला चढत असताना सात दरवाजे लागतात. थोडे वर चढून गेल्यानंतर रिकाम्या जागेत बागेचे स्वरूप देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी बसल्यावर सावलीसोबत वाऱ्याचा हि तेवढाच आनंद मिळतो. किल्ल्यावर असलेली साफ-सफाई किल्ल्याच्या सौन्दर्यतेमध्ये भर घालते. किल्यावर जात असताना आई शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या आतील गाभारा लाकडापासून बनवलेला आहे आणि त्या लाकडांमध्ये कोरीव काम केलेले दिसून येते. पुढे गेल्यावर तोच रस्ता आपल्याला शिवजन्मभूमीकडे घेऊन जातो. शिवजन्मभूमी कडे जात असताना आपल्याला गंगा जमूना या पाण्याच्या टाक्या लागतात त्या पाहण्यासारख्या आहेत. एवढ्या उंचावर असूनही त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या स्वच्छ पाण्याने पूर्ण भरलेल्या दिसतात. शिवजन्मभूमी पासून पुढे जात असतांना बदामी टाके लागते, या टाक्याचा आकार बदामाचा असल्यामुळे याला बदामी टाके नाव देण्यात आलेले आहे. पुढे कडेलोट पॉईंट, वर किल्ल्याचा शेवट होतो. वर किल्ल्यावर जाताना मधे-मधे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. किल्ल्यावर जेवणाची कोणत्याही प्रकारची सोय नाही, पण तुम्हाला लिंबू सरबत, कोकम सरबत अश्या प्रकारची छोटी मोठी दुकाने लागतात. साधारण किल्ला पाहायला १ तास लागतो.
मग कधी भेट देताय शिवनेरी किल्ल्याला ?
तुम्हाला जर या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असेल तर, तुमच्या सोयीसाठी मी मॅप ची लिंक खाली देत आहे तिची मदत घ्या.
---------------------------------
----How to Reach----
---------------------------------
goo.gl/maps/Jq...
From Pune - 95 km
From Mumbai - 155 km
...........................................
Shivneri Fort is a 17th-century military fortification located near Junnar in Pune district in Maharashtra, India. It is the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Maratha Empire.
The nearest town Junnar is a taluka place and is well connected by road. Junnar is about 95 km from Pune. The fort is at about 2-3 km from the junnar town. It is easy to reach the fort top via main entrance, however the trekkers with proper climbing equipment can try the chain route which is located on the western scarp of the fort. From the top of the fort, Narayangad, Hadsar, Chavand and Nimgiri forts can easily be seen.
Information Source: Wikipedia en.wikipedia.o...
Thank You for Watching!!🌍
Негізгі бет Shivneri Fort Junnar || शिवनेरी किल्ला जुन्नर🚩
Пікірлер: 34