Accompanist: Tabla - Shri Swapnil Bhise
26th March 2022 @ Lonavala
जयपूर घराण्याचे युवा सारंगी वादक मोमीन खान यांनी मारुबिहाग राग विलंबित एकतालामध्ये सादर करताना विलंबित लयीचा विचार करून तब्येतीत एकेक स्वरांचा आनंद घेत रागाची मांडणी केली.
एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर विहार करताना मिंड घेण्याची त्यांची खासियत दाद मिळवून गेली.
चोवीस वर्षीय मोमीन खान यांच्या सारंगी वादनामध्ये रागाचे भाव दर्शन झाले. मोमीन खान यांनी वादन केलेली आजोबा मेहबूब खान यांची बंदा तान श्रोत्यांची वाहवा मिळवणारी होती.
तीनतालामध्ये लयकारी करताना मोमीन यांनी वेगवेगळ्या छंदामध्ये ताना आणि तिहायानी सजवलेले वादन केले, ज्याला तबलासाथ करताना स्वप्नील भिसे यांनी त्याच छंदात उत्तर दिले.
सारंगी वादनाला साथ करण्याची भूमिका स्वप्नील भिसे यांनी बखुबीने निभावली, हे विशेष.
Негізгі бет Музыка Shri Momin Khan - Raga Maru Bihag - Sarangi - LKSS.22
Пікірлер: 8