(ह्या गीताचे बोल स्क्रीन रायटर्स असोशिएशन मुंबई द्वारा रजिस्टर आहे)
ह्या गीताची कोणीही कॉपी किंवा रिमिक्स करू नये, असे केल्यास स्क्रीन रायटर्स असोसिएशन च्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
Gudalwar Films
Presents
आता सोडून दे तू दारु
दिग्दर्शक / गीतकार : रमेश गुडलवार
निर्माती : निलम रमेश गुडलवार
कलाकार : साई भोईर, राजेश मासमारे, सरस्वती सातवी
गायक : जगदीश दादा पाटील
संगीतकार : डीजे अक्षय, बबलू पाटील
मिक्स मास्टर : D.J. Akshay Pro
व्हिडिओग्राफी : आर. बी. राऊत, अनिल राऊत
सहकलाकार : केतन जनाठे, जयराम कान्हा तरे, कुसुम जयराम तरे, सातक संदीप बरड, सोहम सचिन बरड
लोकेशन : दुर्वेस गाव
नमस्कार मित्रहो, गुडलवार फिल्म्स सादर करीत आहे "आता सोडून दे तू दारु". या सॉंग मधे दारू मुळे पूर्ण परीवाराची कशी दुर्दशा होते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
नवरा दारू पिऊन आल्यावर बायकोशी भांडतो, कधी तिला मारतो. अशा त्या वातावरणात शेतातून / कंपनीतून दिवसभर काम करून आलेल्या त्या माऊलीची काय अवस्था होत असेल, शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींना घरचं असं वातावरण बघून त्यांच्या मनावर किती मानसिक परिणाम होत असेल, याची आपण कल्पना करू शकतो.
दारु मुळे पैशाचं नुकसान होते हे आपल्याला दिसतं, दारूमुळे चारचौघात आपला अपमान होतो हे दिसतं, पण दारू मुळे कुटुंबातील पूर्ण माणसांना मानसिक त्रास किती होतो याचा आपण विचार करू शकत नाही. ज्याच्यावर बीतते तोच जाणू शकतो.
आपण कधी एखादा पाव्हणे म्हणून गेला असाल तर आपल्याला अनुभव आला असेल की बाप त्याच्या अभ्यास करत असलेल्या मुलाला / मुलीला बियर आणायला घालवतो. विचार करा त्या गोष्टीचा त्या शाळा शिकत असलेल्या त्या मुलावर / मुलीवर काय परिणाम होत असेल, आणि बाप त्या मुलाला कोणत्या तोंडाने सांगू शकेल की "मुला तू व्यसन करू नको".
हे गाणं कोणाचाही विरोधात नाही, कुणाचाही अपमान करण्याच्या उद्देशाने बनविले नाही. समाजात एक चांगला संदेश जावा म्हणून हे सॉंग बनविले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सॉंग फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे, माझी सर्व युट्यूबरांना हात जोडून विनंती आहे की, हे गाणं घराघरात पोहोचलं पाहिजे. सर्वांनी सपोर्ट करा. एखादं लव सॉंग बघून जसं तरूण तरुणीला वाटतं की आपण सुद्धा प्रेम करायला पाहिजे, तसंच हे सॉंग बघून एखाद्या दारू पिण्याऱ्याला वाटलं की आपण सुद्धा दारू सोडायला पाहिजे, तर हे गाणं बनविण्याचा आमचा उद्देश सफल झाला असे आम्ही समजू.
धन्यवाद…🙏🙏🙏
For Any Inquiries, Contact Us On : Gudalwarfilms@gmail.com
#rajababu
#saraswatisatvi
#gudalwarfilms
Негізгі бет आता सोडून दे तू दारू /Ata Sodun De Tu Daru / व्यसनमुक्ती Special Song /Jagdish Patil /Gudalwar Films
Пікірлер: 398