तुरोरी ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या बांधवांवर झालेल्या भ्याडहल्ल्याच्या निषेधार्थ आवाज उठवण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते.मा.श्री.दौलतनाना शितोळे साहेब यांनी उस्मानाबादचे डीवायएसपी व उमरग्याचे पीआय पोलीस अधिकारी यांना फोन करून या प्रकरणाबाबत विचारपूस केली व योग्य निर्णय घेण्याची, सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
तसेच येणाऱ्या शुक्रवार दि-१५-७-२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता उमरगा तहसील कार्यालयावर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य (शाखा उस्मानाबाद जिल्हा) यांच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसेच उमरगा तालुका जिल्हा उस्मानाबाद व निलंगा तालुका जिल्हा लातूर या विभागांमध्ये बेरड, बेडर, रामोशी समाज बांधवांवर अशा प्रकारच्या अनेक खोट्या केसेस घालून पोलिसांचा व राजकीय नेत्यांचा नाहक त्रास नेहमीच अन्यायकारक ठरत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार या मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे तरी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
कळावे
जय मल्हार क्रांती संघटना उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्हा.
Негізгі бет तुरोरी ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही लोकनेते दौलतनाना शितोळे
Пікірлер: 16