वैनगंगा - नळगंगा - पैनगंगा नदीजोड प्रकल्प येत्या चार महिन्यांत आरंभ होणार, विदर्भातील शेतीला नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा, आज विधानसभेत मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांची विधानसभेत तपशीलवार माहितीः
विदर्भातील दुष्काळी भागात पाणी वळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प असलेल्या वैनगंगा - नळगंगा - पैनगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी विधानसभेत अत्यंत तपशीलवार माहिती देऊन या प्रकल्पाची पुढील दिशा निश्चित केली.
मा. मुख्यमंत्री म्हणाले की, वैनगंगा - नळगंगा - पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 83 हजार 646 कोटी रुपये खर्च येणार असून आम्ही महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पास प्राधान्य दिले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा फायदा नागपूर, अमरावती, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, अकोला व वाशिम या जिल्ह्यांना होणार आहे.
या प्रकल्पाची सद्यस्थिती सभागृहापुढे मांडताना मा. मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्यस्तरीय तांत्रिक समिती SLTC पुढे या प्रकल्पाची छाननी सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत ती पूर्ण होईल आणि SLTCच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्याकडून एक महिन्याच्या कालावधीत मंजुरी प्राप्त केली जाईल. त्यानंतर तातडीने या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली जाईल आणि प्रशासकीय मंजुरीचे आदेश निर्गमित केले जातील."
एकंदरीत पुढील चार महिन्यांत वैनगंगा-नळगंगा - पैनगंगा नदीजोड प्रकल्प महायुती सरकार द्वारे वेगाने मार्गी लागेल. या योजनेत पैनगंगा नदीजोडणीची माझी मागणी कालच उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मान्य केली असून संपूर्ण विदर्भातील शेतीला नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला याचा आनंद मोठा आहे.
#महाराष्ट्र #maharashtra #amaravati #amaravati #विदर्भ #vidarbha #प्रकल्प #सिंचन #पेनगंगा #नदी #फडणवीस #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री
Негізгі бет वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प येत्या चार महिन्यांत आरंभ होणार,८३ हजार ६४६ कोटीची तरतुद
Пікірлер: 13