#gharchaswaad #kokanirecipe #valachebirde #broadbeengravy
कोणत्याही शुभकार्यात किंवा मंगलकार्यात सोप्या आणि कोकणी पद्धतीत बनवता येईल असे स्वादिष्ट वालाचे बिरडे. Easy & Simple Recipe By Gharcha Swaad.
साहित्य 👉 २०० ग्रॅम मोड आलेले कडवे वाल, ६ tbl spn तेल, १ tea spn राई, १ tea spn जीरे, ½ tea spn हिंग, ८/९ कडीपत्त्याची पाने, २ कांदे पात्तळ बारीक चिरलेले, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टोमॅटो माध्यम काप केलेले, २½ tbl spn घरगुती लाल मसाला, ½ tbl spn घरगुती गरम मसाला, १ tea spn हळद, एक बटाटा मध्यम काप केलेला, १½" गुळाचा खडा, ४ tbl spn ओल्या नारळाचा खीस, २ अख्ख्या हिरव्या मिरच्या, अर्ध्या मूठभर कोथिंबीर, ६/७ लसणाच्या पाकळ्या ½" आले आणि चवीनुसार मीठ.
Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट असा आगरी कोळी मसाला 👉 • Agri Koli Homemade Mas...
कृती 👉 एका पातेल्यात तेल घालून गरम करावे आणि त्यात राई, जिरे, हिंग आणि कडीपत्ता घालून फोडणी तयार करावी. फोडणीत कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कांदा परतून घ्यावा. कांदा हलका मऊ झाल्यानंतर त्यात काप केलेले टोमॅटो घालावे आणि टोमॅटो चांगले गळेपर्यंत परतून घ्यावे. कांदा आणि टोमॅटो चांगले शिजल्यावर त्यात घरगुती लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घालून छान परतावे. परतून झाल्यावर त्यात मोड आलेले वाल आणि काप केलेले बटाटे घालावे. वाल आणि बटाटे मसाल्यात चांगले एकजीव करावे. एकजीव करून झाल्यावर वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. एका बाजूला मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा खीस, २ अख्ख्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, आले घालून चांगले वाटण तयार करून घ्या. ५ मिनिटानंतर झाकण उघडा आणि संपूर्ण वालाचे मिश्रण परतून घ्या. परतून झाल्यानंतर त्यात १½ ग्लास भर गरम पाणी घाला.. बिरडं चांगला घोळून घ्या. पुन्हा वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढा. ५ मिनिटानंतर झाकण उघडा आणि बटाटे, वाल अर्धवट शिजले असतील तर त्यात तयार वाटण, गूळ आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा. आता मध्यम आचेवर १० मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. ५-५ मिनिटांनी झाकण उघडून घोळून घ्या. १० मिनिटानंतर गॅस बंद करावा आणि गरमागरम घटघटित वालाचे बिरडे भाकरी सोबत वाढावे. धन्यवाद !
टीप 👉 १) बिरडे जास्त पात्तळ बनवू नये २) मोड चांगले येण्यासाठी कच्चे कडवे वाल एका कपड्यात गुंडाळून त्यावर धोक्याने हलके फटके मारावे. ३) वरील साहित्यात बटाटे हे पर्यायी आहे.
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль Valache Birde | कोकण स्टाईल स्वादिष्ट मोड आलेल्या वालाचे बिरडे | Broad Beans Gravy Simple Recipe
Пікірлер: 413