#विदर्भाचे भाग्य बदलणारा अभूतपूर्व, ऐतिहासिक निर्णय,
वैनगंगा ते नळगंगा नदीजोडणी योजनेत पैनगंगा नदीजोडणीच्या मागणीस उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची विधानसभेत तत्त्वतः मान्यता...
विदर्भातील दुष्काळ संपवण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा ते नळगंगा नदीजोडणी या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये पैनगंगा नदीजोडणी केल्यास त्याचा फायदा बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील गावांना होईल ही आग्रही मागणी आमदार श्वेता महाले विधानसभेत पुन्हा मांडली असता या मागणीस उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तत्त्वतः मान्यता देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
काहीही झाले तरी बुलडाणा जिल्ह्यापर्यंत या योजनेतून पाणी येईलच, अशी घोषणा मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत केली आहे.
आजच्याच दिवशी म्हणजे 27 डिसेंबर 2019 रोजी हीच मागणी मी विधानसभेत केली होती. मात्र विदर्भावर सतत अन्याय करणार्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या मागणीला स्थगिती दिली. त्यामुळे ही योजना आणि विदर्भाचा विकास, दोन्ही रखडण्याचे अपश्रेय महाविकास आघाडी सरकारचेच आहे.
मात्र या योजनेचे महत्त्व जाणून आमदार महल्ले यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला व आज या मागणीस अभूतपूर्व यश मिळाले याचा मनस्वी आनंद होत आहे. जसे समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राला उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर केले आहे त्याच प्रकारे विदर्भातील शेती व विकासाचे अर्थकारण आमूलाग्र बदलून टाकणारा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार! परंतु सदर महत्वाच्या आणि वाशिम जिल्ह्यातील विशेषतः रिसोड तालक्यातील पैन गंगा नदी काठावरील शेतकरी या नदी जोड योजनेत समाविष्ट झाल्याने सुखावणारं आहे परंतु एवढ्या वर्षात नुसत थंड बसणारे आमदार यांना हा महत्वाचा मुद्दा विधान सभेत कधीच मांडला नाही कारण त्यासाठी विकासाची आणि शेतकरी हिताची मनात तळमळ लागते जी रिसोड विधानसभा लोक्रतिनिधींच्या मनात नाहीये पण आमच्या जिल्ह्यातील प्रश्न आपण उपस्थीत केला त्याबद्दल आपले आभार श्वेता ताई
#महाराष्ट्र #maharashtra #amaravati #वाशिम #washim #अकोला #akola #बुलढाणा #buldhana #यवतमाळ #yawatmal #विदर्भ #vidarbha
Негізгі бет विदर्भासाठी ऐतिहासिक निर्णय,वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेत पैनगंगा नदीजोडणीस मा.फडणवीसानी दिलीमान्यता
No video
Пікірлер: 2