#BolBhidu #VineshPhogat #HaryanaElections
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटनं ६ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर रात्री उशिरा तिला जुलाना विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाली. महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेली विनेश, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये बरीच चर्चेत राहिली. तिनं सलग ८२ सामने जिंकणाऱ्या जपानच्या युई सुसाकीला हरवलं, ती फायनलमध्येही पोहोचली, पण शेवटच्या सामन्याआधी तिचं वजन १०० ग्रॅमनं जास्त भरलं आणि तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरण्यात आलं. ऑलिम्पिकनंतर कुस्तीतून निवृत्ती घेण्याची घोषणा करणाऱ्या विनेशनं आता राजकारणात एन्ट्री केलीय. खरं तर ती सुरुवातीला राजकारणात येण्यास इच्छुक नसल्याचं बोललं जात होतं.
पण शुक्रवारी ६ सप्टेंबरला विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिला उमेदवारीही मिळाली. विनेशनं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हरियाणात काँग्रेसची ताकद वाढल्याचं, काँग्रेसला अनेक जागांवर फायदा होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. विनेश फोगाटमुळे काँग्रेसला नेमका कसा फायदा होऊ शकतो ? विनेशपुढं या निवडणुकीत कोणती आव्हानं असतील? ती कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Vinesh Phogat Joined Congress: Haryana Elections मध्ये उमेदवारी, भाजपला धोबीपछाड की डाव उलटणार ?
Пікірлер: 184