Zanjar Zanjar
(Radheche Prahar)
Credits -
Singer- Susmirata Dawalkar
Lyrics - Vaibhav Joshi
Composition - Kaushal Inamdar
Music Arrangement - Kamlesh Bhadkamkar
Percussion _ Nilesh Parab
String Quartet - Prayash Biswakarma , Kalyanee Mujumdar, Francis Mendes, Leo Velho
Recording, Mixing and Mastering - Avadhoot Wadkar (Ajivasan Studio, Mumbai)
Visuals - Omkar Kale
Graphics and Video Editing - Sagar Patwardhan
झांजर झांजर
झांजर झांजर आभाळ झांजर
फिरून झांजरलं
निळ्याच्या ओढीनं निळ्याचं सपान
राधेनं पांघरलं
निघू का निघू का म्हणत चांदवा
नभात रेंगाळला
अशात उन्हाचा कुंकुम करंडा
पूर्वेला हिंदाळला
केशर पिंजर भरत हरीनं
चित्तर चित्तारलं
हुम्मकन् फिरली वेणूत झुळूक
वावर हुंकारलं
धम्मक प्रहरी यमुनेच्या तिरी
मोहन लगटला
लाजून झाकले डोळे तर उरात
सावळ्या प्रगटला
थेंबाळ थेंबाळ यमुना माईनं
स्तनांना संभारलं
जरीचा पदर मायेचा करून
कान्ह्याला गोंजारलं
कातर कातर काहूरसांजेला
वेव्हार परतला
आतूर आतूर दिठीतुनी हळू
गोपाळ निसटला
आचार इचार संसार म्हणत
मनाला झिडकारलं
गोविंद गोविंद ठेवलं कंठात
अनय पुकारलं
रातीच्या प्रश्नांनी उत्तररातींना
आला गं थकवा
नजर चोरून चालले तरीबी
प्राणाला चकवा
झांजर झांजर सावळं झांजर
प्राणांत झांजरलं
उजेड पाठीला घेऊन राधेनं
निळ्याला पांघरलं
Негізгі бет Zanjar Zanjar | Susmirata Dawalkar | Vaibhav Joshi | Kaushal Inamdar | Radheche Prahar
Пікірлер: 46