नमस्कार, jalgoan Tadka Recipe म्हणजे तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत..
आज आपण १० किलो प्रमाणामध्ये कैरीचे लोणचं करणार आहोत ...खानदेशी पद्धतीने मी आज लोणचे कसे तयार करायचे ते दाखवणार आहे... व्हिडिओमध्ये लोणच्याकरिता लागणार संपूर्ण साहित्य प्रमाणशीर ,तसेच लोणचे अजिबात खराब होऊ नये आणि टिकावं म्हणून संपूर्ण टीप्स सांगितलेल्या आहेत... तुम्ही किलो प्रमाणे मसाल्यांचे प्रमाण कमी अधिक करू शकता.. तसेच लोणचं करण्यासाठी एक घरगुती मसाला सुद्धा वापरलेला आहे ...त्याचे प्रमाण सुद्धा खाली दिलेले आहे .. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा.. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे कळवा.. चॅनलला सबस्क्राईब( Subscribe ) करा.. आणि बेल ( Bell )🔔 आयकॉन नक्की प्रेस करा...
साहित्य-
कैर्या - १० किलो (Row mango )
शेंगदाणा तेल - २ किलो( peanut oil )
हळद - २ ते ३ चमचे( Turmeric )
धणेपूड- २५० ग्रॅम ( coriander powder )
बडीशेप पावडर - २५० ग्रॅम ( Fennel powder )
मोहरीची डाळ - २५० ग्रॅम ( Split mustard seed )
पटणा मिरचीचे तिखट - २०० ग्रॅम (Patana Red chilli powder )
मेथी दाणे - ३ चमचे ( Fenugreek seed )
लाल सुकी मिर्ची - १० ते १२( Dry red chilli )
तमालपत्र - ७ ते ८ ( Bay leaf )
लवंग - १ चमचा ( cloves )
मिरे - १ चमचा( Black pepper )
हिंग - १ चमचा( Asafoetida )
मीठ - ५०० ग्रॅम ( चवीनुसार )( Salt )
बेडेकर लोणचे मसाला - ३ पॅकेट (३०० ग्रॅम )
( Bedekar pickle masala )
गूळ - ३ किलो( Jaggery )
साखर - १ किलो( Sugar )
*घरगुती मसाल्यासाठी -(Homemade masala)
लवंग - १ चमचा (५ ग्रॅम ) ( Clove )
मिरे - १ चमचा (५ ग्रॅम ) ( Black pepper )
कपुरचीनी - १ चमचा (५ ग्रॅम ) ( Cubeb )
दालचिनी - ३ ते ४ इंच (५ ग्रॅम ) ( Cinnamon sticks )
सुंठ - १ इंच( ५ ग्रॅम ) ( Dried Ginger )
How to make mango pickle,aam ka achar kaise banate hai,khandeshi Lonache recipe By Jalgoan Tadka Recipe,,god Lonache recipe,mitha Aam ka Aachar,Step by step Mango pickle recipe,अचूक प्रमाण योग्य पद्धतीनुसार गोड लोणचे बनवण्याची रेसिपी, खानदेशी गोड लोणचे, कैरीचे आंबट गोड तिखट लोणचे ,आम का अचार.
महत्त्वाच्या टिप्स-
१) लोणचे तयार करत असताना वापरली जाणारी भांडी स्वच्छ केलेली असावी पाण्याचा अंश राहिला तर लोणचे खराब होते
२) लोणच्यासाठी मसाले ( धणे ,शेप ,मोहरीची डाळ ,तिखट ,मेथीदाणे ,मीठ ,हळद ) या सर्व वस्तू नवीन, स्वच्छ आणि कोरड्या असाव्यात..
३) लोणच्यासाठी तेल योग्य प्रमाणात वापरावे.. लोणच्याच्या वरपर्यंत तेल असल्याने लोणचे खराब होत नाही ..जास्त वेळ पर्यंत टिकायला मदत होते..
४) लोणचे तीन ते चार दिवस बरणीमध्ये न भरता एखाद्या खोलगट भांड्यामध्ये किंवा बकेट मध्ये ठेवावे.. आणि दिवसाला एक वेळा व्यवस्थित हलवून घ्यावे.. असे केल्याने लोणचे व्यवस्थित मूरते..
५) लोणचे घातल्या घातल्या बरणी मध्ये भरल्यामुळे जसजसे गुळाचे पाणी होते तस तसे लोणचे बरणीच्या बाहेर उतू जाते.. असे होऊ नये म्हणून चार ते पाच दिवस लोणचे खोलगट भांड्यात किंवा बकेटमध्ये ठेवावे. आणि गुळाचे साखरेचे पूर्ण पाणी होऊ द्यावे व मुरू द्यावे..
६) लोणचे भरण्यासाठी काचेची बरणी किंवा चिनी मातेची बरणी वापरू शकता...बरण्या व्यवस्थित धुवून उन्हामध्ये कोरड्या करून घ्याव्या..लोणचे भरण्याच्या आधी बरणीला हिंगाची धुणी द्यावी, म्हणजेच गरम तेलामध्ये थोडा हिंग घालावा व त्यावर बरणी धरावी असे केल्याने लोणच्याला हिंगाचा सुगंध ही राहतो व लोणचं बरणीमध्ये खराब होत नाही...
७) लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी लोणच्यामध्ये ओला हात किंवा ओला चमचा घालू नये..
#खांन्देशीकैरीचेगोडलोणचे
#MangoPickle
#AamKaMithaAachar
#LonchyachiRecipe
#गोडलोणचेरेसिपी
#JalgoanTadkaRecipe
Please like, share,comments, Subscribe and press bell Icon
Thanks For Watching 🙏
धन्यवाद 🙏
Негізгі бет २ वर्ष खाल असं खांन्देशी कैरीचे गोड लोणचे जर बनवाल या पध्दतीने |Mango Pickle | Aam Ka mitha Achar
Пікірлер: 15