दि.०८.०७.२०२४ :
विधानपरिषदेत आज सकाळी अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चेला सुरूवात झाली. राज्यातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी सरकार विविध योजना राबवत त्यांना दिलासा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असं भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेत भाग घेताना सांगितलं. हा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे, सर्व घटकांना न्याय देण्यासाठी सरकार झटत असताना विरोधकांकडून, मात्र अर्थसंकल्पावरुन अपप्रचार केला जात असल्याची टीका यांनी केली. कोणताही पुरावा नसताना महाविकास आघाडीचे नेते, जनतेसमोर जाऊन असत्य कथन करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत असा आरोपही दरेकर यांनी केला.
या चर्चेत बोलताना, शिवसेना ठाकरे पक्षाचे सचिन अहीर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. हा अर्थसंकल्प केवळ गाजराची पुंगी ठरू नये, जे अर्थसंकल्पात आश्वासित केलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी माफक अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. मागच्या अर्थसंकल्पातही अनेक तरतुदी करण्यात आल्या, मात्र त्याचा लाभ प्रत्यक्ष जनतेला मिळाला नाही, असं अहीर यांनी सांगितलं. सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला आहे, मात्र राज्यातली परिस्थिती विदारक असल्याचं त्यांनी सांगितलं.
जळगावमध्ये अतिरिक्त विभागीय क्रीडासंकुल बांधण्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे, आता हा प्रस्ताव उच्च अधिकारप्राप्त समितीसमोर मांडला जाईल. तो मान्य झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर, या क्रीडा संकुलाची प्रक्रिया वेगानं पूर्ण केली जाईल, असं प्रभारीमंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. धुळे, नंदुरबारमधील आदिवासी मुलांसाठी हे महत्वाचा क्रीडासंकुल आहे, असं सांगत यासंदर्भात जे काही प्रश्न आहेत, त्याची तड लावण्यासाठी एक बैठक घेतली जाईल, असं भुसे यांनी सांगितलं. अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं.
त्याआधी, मंत्री दीपक केसरकर यांनी, पावसाची सद्यस्थिती आणि उपाय योजनांची माहिती दिली.
विधान परिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. डावखरे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर अभ्यंकर मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत.
त्यानंतर पावसामुळे विधानपरिषदेचं कामकाजही आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Official KZitem channel of DD Sahyadri News
Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.
DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
KZitem -- / @ddsahyadrinews
Twitter -- / ddsahyadrinews
Instagram -- / ddsahyadrinews
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray
Негізгі бет अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे.
Пікірлер