#BolBhidu #SantoshJagdaleSnakeBite #BhuldhanaCrimeNews
वेफर, केक, चॉकलेट, कचोरी गेलाबाजार एखादा कोल्ड्रिंगचा ग्लास, लहानपणी आपला किंवा आपल्या मित्रांचा वाढदिवस असाच साजरा व्हायचा. पण हळूहळू वाढदिवस साजरा नाही तर सेलिब्रेट व्हायला लागला. रात्री १२ वाजता रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवायच्या. ब्लूटूथवर ढिंकचॅक गाणी लावत मित्राला केक कापायला लावायचा. नुसता कापायचा नाही तर केक मित्राच्या तोंडाला, केसांना आणि कपड्यांना फासायचा. मग स्नो स्प्रेने अंघोळ घालत मित्राला बर्थडे बम्स द्यायचे, हजारो रुपयांची पार्टी उकळायची.
थोडक्यात भाईचा बर्थडे म्हणत त्याचे खरंच बारा वाजवणारा हा सेलिब्रेशनचा पॅटर्न. हे अतरंगी सेलिब्रेशन अनेकांच्या जीवावर बेतल्याचे अनेक व्हिडिओही आपण बघितलेत. बुलढाण्यातल्या चिखलीत असंच एक अनोखं सेलिब्रेशन एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या ३१ वर्षीय संतोष जगदाळेला आपले प्राण गमवावे लागलेत, ते ही एका विषारी सापामुळं. बुलढाण्यात संतोषसोबत नेमकं असं काय घडलं, मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेलेल्या संतोषचा मृत्यू साप चावून कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Buldhana Crime: मित्राच्या वाढदिवसाला गेला, साप चावून मृत्यू झाला, Santosh Jagdale सोबत काय घडलं ?
Пікірлер: 733