गावरान पद्धतीची माठाची भाजी | Village style Amaranth leaves bhaji by Jyoti Hatkhamkar | #cooking
साहित्य:
2 पेंडी माठाची हिरवी भाजी
5 टेबल स्पून तेल
4 लसणीच्या पाकळ्या
3 टेबलस्पून ओल्या नारळाचा चव
2 हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
कृती:
प्रथम दोन पेंडी माठाची हिरवीगार भाजी घेऊन ती साफ करून घेतली .एका पसरट भांड्यामध्ये पाण्यामध्ये अर्धा तास भाजी भिजत ठेवली .भिजत घातल्यानंतर तिला तीन-चार वेळा व्यवस्थित धुवून घेतले. धुतल्यानंतर तिला चिरून घेतली. चिरल्यानंतर चार लसणीच्या पाकळ्या ठेचून चवीनुसार मीठ घेऊन एक चमचा तेल घेऊन भाजीला चोळून घेतले. नंतर एक पसरट जाड कढई गॅसवर मध्यम गॅसवर तापवून घेतली. कढई तापल्यानंतर तीन चमचा तेल घालून घेतले .तेल पूर्ण तापून झाल्यानंतर मग एक मोठा कांदा बारीक चिरून घातला. तो गुलाबी रंगावरती परतून घेतला. कांदा पूर्ण परतून झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या चिरून घातल्या. त्या पण व्यवस्थित परतून घेतल्या. नंतर भाजी घालून घेतली ती पण व्यवस्थित परतून घेतली. मध्यम गॅसवर झाकण ठेवून चार पाच मिनिटं व्यवस्थित वाफ दिली. वाफ देऊन झाल्यानंतर झाकण काढून व्यवस्थित भाजी परतून घेतली. परत पुन्हा दोन मिनिटे अशीच भाजी परतून शिजवून घेतली .परत पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ दिली .वाफ देऊन झाल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घेतली. भाजी मधले पूर्ण पाणी शिजवून काढून सुकवले. भाजी पूर्णपणे सुकल्यानंतर तीन चमचा ओल्या नारळाचा चव घालून परत पुन्हा परतून घेतली. चवीनुसार मीठ घातले. एक चमचा मोठा तेल घालून परतून घेतली दोन मिनिटं परत पुन्हा थोडी शिजवून घेतली.
#mathachibhaji
#amaranth
#chavlirecipe
#chavlibhaji
#dailyrecipe
Thanks for watching ☺️
Негізгі бет गावरान पद्धतीची माठाची भाजी | Village style Amaranth leaves bhaji by Jyoti Hatkhamkar |
Пікірлер: 3