अज्ञात इतिहासाच्या पाऊलखुणाचा शोध... DISCOVERY OF FORGOTTEN HISTORY..
शिवनेरी किल्यावरील दरवाजे व त्यांना दिलेली नावे यावरून उपलब्ध माहितीनुसार प्रश्न उपस्थित केला आहे..
हत्ती दरवाजा व शिपाई दरवाजा यांना अनुक्रमे पीर दरवाजा व हत्ती दरवाजा अशी नावे दिली आहेत..
पुरातत्व ने खातरजमा करून सत्यता पडताळावी व चूक असेल तर कबूल करून पाटी बदलावी...!
-----------------------------------------------------------------------------------------------------------
शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी एका मागोमाग एक असे सात दरवाजे ओलांडावे लागतात. त्यातला पहिला महादरवाजा आहे जो नुकताच पुन्हा बांधला गेला आहे. ह्याचे मूळ स्वरूप कसे होते ते आपल्याला कळत नाही. त्यानंतरचा आहे गणेश किंवा परवानही दरवाजा. ह्याच्या कमानीवर शरभाची, म्हणजे सिंहासारख्या दिसणाऱ्या एका काल्पनिक प्राण्याची शिल्पे आहेत. डाव्या बाजूला ह्या शरभाच्या पुढच्या उजव्या पायाखाली एक कुत्रा कोरला आहे. तर उजव्या बाजूचा शरभ दोन हत्ती व एक गंडभेरुंड पंजात धरलेला दाखवला आहे.
गंडभेरुंडही एक काल्पनिक प्राणी आहे व ते कर्नाटकाच्या राज्यांचे राजचिन्ह होते. हा पक्षी दुतोंडी गरुडासारखा दिसतो व आजही कर्नाटकमधील राज्य परीवहनच्या गाड्यांवर आपल्याला दिसू शकतो. तीसरा दरवाजा आहे पीर दरवाजा. त्यावरही डावीकडे शरभ कोरलेला आहे. इथे त्याच्या पुढच्या उजव्या पायात घोरपड धरलेली दाखवली आहे. हा दरवाजा हत्ती दरवाजा आहे असे कधीकधी सांगितले जाते पण ह्याच्या पुढचा दरवाजा हत्ती दरवाजा आहे.
चौथा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. ह्यावर काही विशेष चिन्हे किंवा शिल्पे दिसत नाहीत. पाचवा दरवाजा संरक्षणाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे बांधला आहे. त्याला नावही तसेच दिले आहे - शिपाई दरवाजा. आक्रमक सैन्याला दरवाज्या समोरच्या दोन चौरस मीटर इतक्या निमुळत्या भागात जावे लागते. हा भाग तीन बाजूंनी उंच भिंतींनी वेढला आहे. इथे एक क्षणभरही थांबले तर वरून बाणांचा व उकळत्या पाण्याचा वर्षाव सहज करता येऊ शकतो.
शिपाई दरवाज्यानंतर आपल्याला शिवाईदेवीच्या मंदिराकडे उजव्या बाजूला वळता येते. त्याऐवजी सरळ गेले तर आपण फाटक किंवा मेणा दरवाज्याकडे जातो. त्यानंतर पुढे कुलाबकर किंवा कुलुप दरवाजा लागतो. हा सातवा दरवाजा असल्यामुळे हा दरवाजा पडला की गडाचे कुलुप उघडले म्हणून बहुदा ह्याला असे नाव मिळाले असावे. ह्या सगळ्या दरवाज्यांमुळे हा गड अत्यंत बळकट मानला गेला. शिवाजीला स्वतः हा कधी जिंकता आला नाही ह्यावरुनही त्याची संरक्षक क्षमता लक्षात येते.
Негізгі бет ही भयंकर चूक असू शकते..? किल्ले शिवनेरीवरील ही मोठी चूक आहे का? - FORT SHIVNERI
Пікірлер: 23