हाडे ठिसूळ होण्याची 7 मुख्य कारणे || 7 major reasons for low bone density
हाडे ठिसूळ होण्याची 7 मुख्य कारणे
1. वाढत्या वयासोबत हाडांची घनता कमी होतं जाते.
2. महिलांमध्ये मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर हाडे ठिसूळ होऊ लागतात. तर पुरुषांमध्ये testosterone hormone कमी झाल्यास हाडे ठिसूळ होऊ लागतात.
3. हाडे मजबूत राहण्यासाठी आहारात कॅल्शियम असणे गरजेचे असते. दूध, पनीर, चिकन, मांस, अंडी, ड्राय फ्रुट्स यांतून कॅल्शियम मिळते. हे पदार्थ आहारात नसतील, तर हाडे लवकर ठिसूळ व कमकुवत होऊ लागतात.
4. कॅल्शियम युक्त आहार घेऊन देखील हाडे ठिसूळ होतं चालली असतील, तर शरीरात विटामीन डी ची कमतरता निर्माण झाली आहे, हे समजावे. कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी विटामीन डी आवश्यक असते. अन्यथा कॅल्शियम मलावाटे बाहेर टाकले जाते.
5. विटामीन डी सूर्यप्रकाशातून अगदी सहज मिळते.
6. शारीरिक हालचाल नसणे, व्यायामाचा अभाव यांमुळे हाडे शीघ्र गतीने कमकुवत होऊ लागतात. चालणे, weight lifting सारखे अवजड व्यायाम प्रकार हाडांना मजबूती प्रदान करतात.
7. धूम्रपान करणे (सिगारेट,बिडी इ. ), अल्कोहोलचे अतिसेवन या गोष्टी शरीरात कॅल्शियमचे अवशोषण होऊ देत नाहीत. परिणामी हाडांची घनता कमी होते, हाडांची निर्मिती होण्यात अडथळे येतात तसेच हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
8. काही औषधांच्या प्रदीर्घ वापरामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते.
9. अनुवंशीकतेमुळे हाडे कमजोर होण्याची शक्यता वाढते. कुटुंबात एखाद्याला हाडांचे प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्हाला देखील ते होण्याची दाट शक्यता असते.
10. वजन कमी असणाऱ्या आणि अंगकाठी किरकोळ असणाऱ्या व्यक्तींना हाडे ठिसूळ होण्याचा धोका जास्त असतो.
Real Marathi KZitem Channel
रियल मराठी युट्यूब चॅनल
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль हाडे ठिसूळ होण्याची 7 मुख्य कारणे || 7 major reasons for low bone density
Пікірлер