दि.०८.०७.२०२४ :
राज्यात सुरु असलेल्या अशा हिट अँड रन म्हणजेच, अपघात करून पळून जाण्याच्या प्रकरणांकडे सरकार गांभीर्यानं बघत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकरणांमध्ये, श्रीमंत किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर करणं अत्यंत चुकीचं असून, अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यानी समाजमाध्यमांवर आपली भूमिका मांडत स्पष्ट केलं आहे. प्रत्येक व्यक्तीचे प्राण सरकारसाठी महत्त्वाचे असून अशा प्रकरणांना गांभीर्यानं घेत, प्रत्येकाला न्याय दिला जावा, असे निर्देश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत, त्यासाठी कठोर कायदे आणि शिक्षांची तरतूद करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण मुख्यमंत्री असेपर्यंत श्रीमंत, शासकीय अधिकारी, राजकीय नेता अशा कोणत्याही कवचाखाली गुन्हेगारांना संरक्षण दिलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली . महाराष्ट्र सरकार पीडीता आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभं आहे. सर्व नागरिकांसाठी सुरक्षित महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतली दारु पिऊन गाडी चालवण्याची प्रकरणं रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची सूचना, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केली. याचबरोबर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब्ज तसंच बारवरही कारवाई करण्याचीही सूचना प्रशासनाला त्यांनी दिली. दारु पिऊन वाहनं चालवण्यानं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
--------- सिंक----------
Official KZitem channel of DD Sahyadri News
Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.
DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
KZitem -- / @ddsahyadrinews
Twitter -- / ddsahyadrinews
Instagram -- / ddsahyadrinews
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray
Негізгі бет हिट अँड रन तसंच ड्रंक अँड ड्राईव प्रकरणं रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना.
Пікірлер