हिंदू कायद्यान्वये मालमत्तांचे वर्ग II Classes of property under Hindu law.
अधिक महितीसाठी हे वाचा:- www.hamshikeng...
#hindu_malmatta_kayda
#हिंदू_मालमत्ता_कायदा
#मालमत्ता_वाटणी
#संयुक्त_कुटुंबाची_मालमत्ता
संयुक्त कुटुंबाची मालमत्ता किवा सहदायात मालमत्ता(Joint-family property or coparcenary property)
स्वतंत्र मालमत्ता किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता (Separate property or self-acquired property)
अशा मालमत्तेमध्ये सर्व सहदायादांची सामुदायीक मालकी आणि सामुदायीक ताबा असतो
अशा मालमत्तेमध्ये खालील मालमत्तांचा समावेश होतो-
(अ) वडिलोपार्जित मालमत्ता
(ब) संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे संपादन केलेली मालमत्ता
(क) "संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेत संम्मिलीत केलेली एखाद्या सदस्याची स्वतंत्र मालमत्ता"
(ड) संयुक्त कुटुंबाच्या निधीच्या सहाय्याने सर्व किंवा कोणत्याही सहदायदाने संपादित केलेली मालमत्ता
'वडिलोपार्जित मालमत्ता' हे संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेची विशिष्टता असते. 'वडिलोपार्जित मालमत्ता' या शब्दाचा अर्थ असा की, जी मालमत्ता वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्यापासून प्राप्त होते. या मालमत्तेत एखाद्या व्यक्तीच्या वंशजांच्या तीन पिढ्या असतात. म्हणजे अशा मालमत्तेत मुले, मुलांची मुले, मुलांच्या मुलांची मुले यांचा जन्मसिध्द अधिकार असतो.
वडिलोपार्जित मालमत्ता फक्त लगतच्या तीन पितृ पिढ्यांपुरतीच मर्यादित असते. आणि आपल्या आईच्या वडीलांकडून मिळालेली मालमत्ता ही वारसदाराची स्वतंत्र मालमत्ता असते ज्यामध्ये त्याच्या मुलांना कोणताही जन्मसिध्द अधिकार प्राप्त होत नाही.
कोणत्याही व्यक्तीला त्याच्या स्त्री नातेवाईकांकडून मिळालेल्या कोणत्याही मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणता येणार नाही.
भावाकडून बहिणीला भेट मिळालेली मालमत्ता, बहिणीच्या मृत्युनंतर तिच्या मुलाला वारसाधिकाराने मिळेल आणि अशी मालमत्ता त्या मुलाची स्वतंत्र मालमत्ता असेल त्याला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणता येणार नाही.
कोणतीही मालमत्ता विभाजन होण्याच्या दिवसापर्यंत संयुक्त कुटुंबाचीच मालमत्ता मानली जाईल. विभाजनानंतर भावांनी मिळवलेली मालमत्ता संयुक्त कुटुंब मालमत्ता म्हणून मानली जाणार नाही.
ज्यावेळी संयुक्त हिंदू कुटुंबातील मालमत्ता एकत्रित करून व्यवसाय केला जातो किंवा संयुक्त कुटुंब मालमत्तेच्या सहाय्याने व्यवसायात संपत्ती मिळविली जाते, ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता बनते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, संयुक्त कुटुंबाच्या निधीच्या मदतीशिवाय, संयुक्त कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्त श्रमांव्दारे मिळविलेली मालमत्ता ही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असल्याचे मानले जाईल.
जेव्हा कोणताही सहदायाद त्याची स्वकष्टार्जित संपत्ती संयुक्त कुटुंबाच्या संयुक्त निधीमध्ये सर्व स्वतंत्र दाव्यांना सोडून देण्याच्या हेतूने, स्वेच्छेने सम्मिलीत करेल तर ती मालमत्ता संयुक्त मालमत्ता बनेल.
अशा प्रकारे सम्मिलीत करण्याची कृती एकतर्फी असते. जेव्हा संयुक्त कुटुंबातील सदस्य आपली मालमत्ता संयुक्त कुटुंबातील मालमत्तांमध्ये सम्मिलीत करतो तेव्हा तो ती भेट देत नाही. यात कोणी दाता नसतो किंवा ज्याला बक्षीस, देणगी मिळते ती व्यक्ती नसतो आणि यासाठी मालमत्ता हस्तांतरण कायद्याची तरतूद लागू होत नाही.
एकदा एकत्रितपणे असे समजले गेले की कुटुंब संयुक्त आहे आणि ते संयुक्त मालमत्ता धारण करतात तर असा कायदेशीर तर्क निर्माण होतो की, त्या संयुक्त कुटुंबातील स्वतंत्र सदस्याने किंवा सर्व सदस्यांनी घेतलेली मालमत्ता ही एकत्रित मालमत्ता आहे. जर एखाद्या सदस्याने संयुक्त मालमत्तेच्या विशिष्ट भागावर आपला स्वतंत्र हक्क असल्याचा दावा केला तर ती त्याची स्वतंत्र मालमत्ता असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुराव्याचा भार त्याच्यावर असेल.
संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या सहाय्याने आणि मदतीने मिळविलेली मालमत्ता देखील संयुक्त मालमत्ता ठरते. अशा प्रकारे, एकत्रित कुटुंबातील मालमत्तेची मालमत्ता, म्हणजे भाडे, इत्यादी, अशा उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ता, विक्रीची रक्कम किंवा अशा मालमत्तेची गहाणखत आणि अशा रकमेतून खरेदी केलेली मालमत्ता देखील संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असेल.
संयुक्त हिंदू कुटुंबात काही सदस्यांच्या नावावर काही मालमत्ता खरेदी केली जाते, तेव्हा ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता म्हणून ओळखली जाईल त्याची स्वतःची स्वतंत्र मालमत्ता नाही. संयुक्त कुटुंबातील मालमत्तेच्या मदतीशिवाय कोणतीही मालमत्ता मिळविली असल्यास ती स्वतंत्र मालमत्ता मानली जाऊ शकेल.
जेव्हा संयुक्त कुटुंबाचा कर्ता त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता विकत घेतो तेव्हा त्याने अशी मालमत्ता स्वत:च्या स्वतंत्र मालमत्तेद्वारे खरेदी केली असे त्याला पुराव्यांसह सिध्द करावे लागेल. अशा पुराव्याच्या अनुपस्थितीत, असे समजले जाईल की अशी मालमत्ता त्याने संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेतून विकत घेतली आहे आणि ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता म्हणून ओळखली जाईल
-----------------------------------------------------------------------------------------------------
Visit our Website: www.hamshikeng...
Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
Follow Us on Twitter: / shikenge
Негізгі бет हिंदू कायद्यान्वये मालमत्तांचे वर्ग II Classes of property under Hindu law.
Пікірлер: 21