आपल्या झोपडपट्टी मधील पहिली मुलगी MBBS डॉक्टर होणार..! ✨⚡
सम्राट अशोक शिक्षण संकुलात बालपणापासून शिक्षण घेतलेली कु. अल्फिया मुस्तफा पठाण या विद्यार्थिनीने NEET 2024 परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवून उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले. ही विद्यार्थिनी शासकीय महाविद्यालयातून पुढील MBBS शिक्षणासाठी पात्र झाली. अतिशय गरिबीत, प्रतिकूल परिस्थितीत या विद्यार्थिनीने संपादन केले. NEET परीक्षा अतिरिक्त मार्गदर्शन करिता मा. रमेश सुतकर सर (संस्थापक-अध्यक्ष, सम्राट अशोक मंडळ, सोलापूर ) आणि ॲड. अशोक ताजणे (ज्येष्ठ विधीज्ञ, मुंबई उच्च न्यायालय) यांनी अर्थसहाय्य केले.
अल्फिया "यशोधरा ज्युनिअर कॉलेज" ची विद्यार्थिनी असून बोर्ड परीक्षा व NEET परीक्षेकरिता प्रा. पंकज सुतकर, मीनाक्षी कलशेट्टी, सुहास उडाणसिंह, शशिकांत मोहिते, मोनिका काळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. अल्फीयाची आई कपड्याच्या दुकानात कामाला असून वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडपट्टी भागातून हे यश अल्फियाने संपादित केले आहे. समाजातील सर्व स्तरातून असल्याचे कौतुक होत आहे.
Негізгі бет झोपडपट्टीत राहणारी अल्फिया होणार डॉक्टर ! NEET परीक्षेत यशोधरा कॉलेजच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश💐💐
Пікірлер: 7