जुन्नर तालुक्यातील ओतुर पोलीस स्टेशन येथे सुभाष घुले व ईतर अज्ञात व्यक्ती विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेतवड येथे खंडाने शेती करत असलेल्या शेतकरी सचिन बटवाल यांना ओतुर येथील सुभाष घुले यांनी फोन करुन, तुझी कुठे भांडणे झाली आहे का? कुणीतरी ठाण्यातल्या गुंडाना तुला मारण्यासाठी १० लाखांची सुपारी दिली आहे असे सांगत ओतुरला भेटायला बोलवले.
सचिन बटवाल हे ओतुर येथे सुभाष घुले यास भेटायला गेले असता, घुले याने बटवाल यांना पुन्हा विचारले की, तुझी कुणाबरोबर भांडणे झाली आहेत यावर बटवाल म्हणाले की मी शेतमजूर आहे माझी कुणाशी कसलीही भांडणे नाहीत. यावर घुले याने सांगीतले की, कुणीतरी ठाण्यातल्या गुंडांना तुझ्या मर्डरची सुपारी १० लाखांना दिली आहे. त्यांच्याकडे तुझा फोटो, तू कुठे राहतो कुठे फिरतो याची सर्व डिटेल आहे, ते तुला मारण्यासाठी ईकडे बर्याचदा येवुन तुझा पाठलाग करत होते. एकदा तुझा मर्डर होणारच होता पण तुझ्यासोबत तुझी बायको असल्यामुळे तु वाचला. ते गुंड माझ्या ओळखीचे आहेत त्यामुळे त्यांनी तुझ्याबाबत विषय माझ्याकडे काढला. मी म्हटलो तो गरीब शेतमजूर आहे त्याला नका मारू म्हणून त्यांनी आतापर्यंत तुला मारले नाही. त्या गुंडांना १० लाखांच्या सुपारी पैकी ७० टक्के पैसे टोकन मिळाले आहेत . तरीही माझ्या शब्दामुळे अजून त्यांनी काही केले नाही. त्यांना तुझ्याकडून ५ लाखाची अपेक्षा आहे. तु त्यांना ५ लाख नाही दिले तर नाहीतर ते समोरच्याकडुन १० लाख घेवून तुला तीन मिनटात सपासपा वार करून मारुन टाकतील, तुझी बायका पोरं उघड्यावर येतील. बघ तुला काय करायचे ते लवकर सांग. असे सांगुन भिती दाखवली. या प्रकारामुळे सचिन बटवाल पुर्णपणे घाबरून गेले होते. यानंतर पुन्हा सुभाष घुले याने वारंवार सचिन बटवाल यांना फोन करून भेटायला बोलावले, बटवाल तेथे गेले असता सुभाष घुले याने सांगीतले की, तु पैशाची सोय केली का? त्या गुंडांचा पुन्हा फोन आला होता. मी त्या गुंडांना सांगितले की तो गरीब आहे. मारू नका. तो पैशाची व्यवस्था करत आहे. म्हणून ते शांत बसले आहे. तु लगेच पैशाची सोय कर. पैसे नसतील तर कुणाकडून उसने आण आणि हा विषय संपवून टाक ते गुंड कधीही तुला मारुन टाकतील. माझ्यामुळे ते शांत आहेत.
यावर बटवाल म्हणाले, मीच शेतमजुरी करतोय, माझी ५ लाख देण्याची ऐपत नाही. माझा कुणासोबत वाद पण नाही, माझी १० लाखाची सुपारी देणारा कोण आहे. आणि ते गुंड समोर येत का नाही.
यावर सुभाष घुले याने सांगीतले की, ते गुंड तुला सर्व माहिती देतील, तुझी सुपारी कोणी आणि कोणत्या कारणासाठी दिली ते सगळे सांगतील. पहिले तु पैशे आण. ते गुंड लगेच समोर येणार नाही. ते प्रत्येक वेळी नवीन सिम वापरतात. ते सराईत असतात जास्त काही विचार करू नको पैसे घेवुन ये आणि विषय मिटवून टाक नाहितर ते तुला मारून टाकतील. यावर सचिन बटवाल म्हणाले, माझेकडे पाच लाख रुपये नाहीत. यावर घुले म्हणाला की, मग किती आहेत? आपण कमी जास्त करु, मी त्यांना सांगतो ते गुंड माझे ऐकतात, तु पैसे लवकर दे. नाहीतर आज ना उद्या, सहा महिन्यानी तुला ते मारुन टाकतील.
या प्रकारामुळे सचिन बटवाल हे भितीत जगत होते. सुभाष घुले हा वारंवार फोन करुन पैसे मागुन. नाही पैसे दिले तर तुला ते मारून टाकणार आहेत असे सांगत होता. घुले हा त्या गुंडाची नावे सांगत नसल्यामुळे व सारखा पैसे मागत असल्यामुळे सचिन बटवाल यांची खात्री पटली की, सुभाष घुले हा अज्ञात गुंडांची भिती दाखवून ५ लाखांची खंडणी मागत आहे. त्यानुसार बटवाल यांनी सुभाष घुले यांच्या विरुध्द ओतुर पोलीस स्टेशन मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. परशुराम कांबळे हे करत आहेत.
जुन्नर टाईम्स, ओतुर
Негізгі бет जिवे ठार मारण्याची धमकी देत मागत होता १० लाखाची खंडणी. आयताच जाळ्यात सापडला.
Пікірлер: 50