काकांचे मुंबईतले नवीन घर 😍 | (गृहप्रवेश) प्रदनु आपल्या घरी आला - Panvel (Navi Mumbai) माझ्या काकांनी मुंबईमध्ये विरार येथे नवीन घर घेतले आहे. आम्ही सगळेजण घरातील मंडळी काकांच्या घरी विरार येथे त्याच्या घराच्या गृहप्रवेश निम्मित विरार येथे गेलो होतो. आम्ही सगळे घरातील मंडळी एकत्र गावावरून मुंबईला आलो. प्रांजु आणि प्रदनु एकत्र भेटले. बायको वर्षा आणि आम्ही सगळेजण आमच्या पनवेलच्या घरी पूजा करून गेलो. काकांची संपूर्ण कुटुंब आता मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. मुंबईमध्ये प्रत्येकाचे नवीन घर घेण्याचे स्वप्न असते. काकांचे घर हे विरार येथे फुलपाड्यात आहे. आम्ही त्यांच्या नवीन घराच्या पूजेनिम्मित सहपरिवार गेलो होतो. नवीन घराच्या गृहप्रवेशाला आमच्या भावकितील, नातेवाईक मंडळी आली होती. आमच्या गावातील बहुतेक कुटुंबे ही नालासोपारा आणि विरार या ठिकाणी स्थायिक आहेत. काकांचे मुंबईतील नवीन घर खूप सुंदर आहे. गावावरून खास आका म्हणजे माझी आत्या आली होती. काकांच्या घरची पूजा खूप छान झाली.#NewHouseInMumbai #KakancheNavinGhar #Gruhpravesh #sforsatish
आमच्या पनवेलच्या घरी माझी छोटी बहीण पूजा आलेली आहे. बहीण महिनाभर पनवेल येथेच आहे. वर्षा आणि प्रदनुला अद्विकला भेटायचं होतं. बहिणीला सुद्धा बाबू प्रदनुला भेटायचं होतं. आम्ही पूजा आटोपून पनवेल येथे निघालो. माझी आत्या गावाला जाणार होती. त्याच दिवशी दोन गाड्या गावी जाण्यासाठी होत्या. आम्ही सांध्याकाळी निघालो. पनवेल येथे पोहचायला चार तास लागले. रस्त्याला ट्राफिक लागली त्यामुळे आम्ही उशिरा पोहोचलो. आम्ही घरी येऊन सगळेजण भेटलो. वर्षा आणि प्रदनु गावावरून पाच महिन्यांनंतर पनवेलला आले आहेत. आता आई सुद्धा मुंबई पनवेल येथे आहे. पुढचे काही दिवस घरी फुल्ल धमाल असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काकांचे मुंबईतील नवीन घर दाखवले. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपले मुंबईत स्वतःचे छोटे की मोठे एक घर असावे. मुंबईत जो कोणी मेहनत घेतो त्याचे स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण होते. आता काकांची संपूर्ण फॅमिली मुंबई येथे स्थायिक झाले आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलेले काकांचे घर तुम्हाला कसे वाटले घर आवडल्यास लाईक शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет काकांचे मुंबईतले नवीन घर (गृहप्रवेश) 😍 | प्रदनु आपल्या घरी आला - Panvel (Navi Mumbai)
Пікірлер: 339