♥️कोकणातील पालखी सोहळ्याचा जल्लोष 🚩 ढोल ताशांच्या गजरात श्री भैरी देवाची मिरवणूक काढली | Konkan Shimga #shimga #palkhi #konkanshimga #viral #kokanatil
होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षं ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानल जातं. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो.
Негізгі бет ♥️कोकणातील पालखी सोहळ्याचा जल्लोष🚩ढोल ताशांच्या गजरात श्री भैरी देवाची मिरवणूक काढली | Konkan Shimga
Пікірлер: 5