कोकणातील रहस्यमय मंदिर - गणेश मंदिर , गणेशगुळे-रत्नागिरी । दुसऱ्या घुमट खाली नक्की काय आहे
गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे.
जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
पण मूर्ती पाठी नक्की त्या 7,8ft जागेमध्ये काय दडलं आहे हे कोणालाच अजून माहीत नाही आहे .. त्या जागेत भुयार आहे की खोली की अजून काही की फक्त ते पाषाण आहे काहीच माहित नाही.. शोध घेतला पाहिजे म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ...
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
E-mail - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#ganeshguletemple #ratnagiri #kokan #temple #mysterious #ganeshgule
Негізгі бет कोकणातील रहस्यमय मंदिर - गणेश मंदिर , गणेशगुळे-रत्नागिरी । दुसऱ्या घुमट खाली नक्की काय आहे ?
Пікірлер: 118