श्रीस्वामीभक्तहो,
ll श्रीस्वामी समर्थ ll
मागील एपिसोड मध्ये आपण श्रीस्वामी महाराजांचे अक्कलकोटी आगमन ऐकले. परब्रह्म या अक्कलकोट गावात आले आणि या गावचे स्वरूपचं पार बदलून गेले. रोज शेकडो भक्त मंडळी श्रींच्या दर्शनास येवू लागली. गावात कधी नाही ते भरपूर टांगे दिसू लागले. लोकांना कामधंदा मिळाला आणि गावाची भरभराट झाली.
या बद्दलची नोंद श्रीस्वामी महाराजांच्या जुन्या चरित्रात पाहायला मिळते.
श्रीस्वामी महाराज हे मुलब्रहम्ह होय. निराकार परमात्म्याने आपल्यासाठी देह धारण केला आणि ठीक ठिकाणी ब्रह्मंती करून अखेर अक्कलकोट ग्रामी विसावला. खरे तर त्याला देह नाही, रूप रंग काही नाही. निखळ पाण्याला कधी कोणता रंग असतो का ? त्या शुद्ध पाण्यात पाहिले तर आपलीच प्रतिमा दिसणार. नाही का !..अगदी तसेच श्रीस्वामी महाराजांचे आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाला श्रीस्वामी महाराजांमध्ये आपले आराध्य दैवत दिसले. कोणाला प्रभू श्रीरामचंद्र दिसले तर कोणाला श्रीकृष्ण दिसला. कोणाला आदिशक्ती तुळजाई तर कोणाला करवीर वासिनी अंबा आई. एवढेच नाही तर एका मुसलमानाला तर त्याच्या परवतदिगार अल्लाहतालांचा भास झाल्याच्या नोंदी आपल्याला श्रींच्या चरित्रात आदळतात....असो.
विशेष म्हणजे हे अक्कलकोट गाव श्रीदत्तप्रभूंच्या गाणगापूरच्या वाटेवर आहे. त्यामुळे या गावात गाणगापूरच्या यात्रेकरुंची खूप वळदर असे. त्यातील बहुतांश भक्तांना श्रीमहाराजांमध्ये श्रीदत्त महाराज दिसले आणि अक्कलकोटच्या श्रीस्वामी महाराजांची श्रीदत्त प्रभूचा अवतार म्हणून ख्याती झाली.
गुजरातच्या जुनागड प्रांतात गिरनार पर्वत हे श्रीदत्त प्रभूंचे जागृत स्थान होय. सुमारे दहा हजार पायऱ्या चढून गेल्यावर येथील शिखरावर श्रीदत्त पादुकांचे दर्शन घडते. हजारो भाविक इथे येत असतात. गुरुशिखरवर श्रीपादुकांचे दर्शन घेतात.
या गिरनार पर्वतावर सुद्धा श्रीस्वामी महाराजांचे काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे श्रीस्वामी भक्तांची पण या स्थानावर विशेष श्रद्धा आहे. श्रीस्वामीराज माऊली टीमचे सदस्य श्री. विक्रांत हटकर यांना काही दिवसापूर्वी गिरनारच्या गुरुशिखरावर जाण्याचे भाग्य लाभले,...त्या बद्दलचा हा वृत्तांत आपण त्यांच्या कडूनच ऐकुया....पाहूया.
आपला,
श्रीस्वामीराज माऊली टीम सह
मिलींद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
आश्विन शु. १२ (द्वादशी)
रविवार, दिनांक: १७ ऑक्टोबर २०२१
--------------------------------------------------
विडिओ मध्ये सिद्धहस्त शेखर साने दादा ह्यांनी काढलेली काही स्वामींची सुंदर चित्रे आहेत.
---------------------------------------------------
वरील विडिओ मध्ये पुढील दुरुस्ती आहे :
-------------------------------------------------
लंबे हनुमान आणि चढवाव हनुमान हे दोन्ही वेगवेगळे आहेत. वरील विडिओ मध्ये लंबे हनुमान आणि चढवाव हनुमान चुकून एकच सांगितले आहेत
कमंडलू कुंड येथे धुनी हि फक्त दर सोमवारी असते चुकून पौर्णिमा हि सांगितली गेली आहे.
क्षमस्व !!
विक्रांत हटकर
#girnar #girnari #girnari #girnarjunagadh #junagadh #gurushikhar
Негізгі бет एका श्रीस्वामीभक्ताची गिरनार यात्रा. ShreeSwami devotee's Girnar yatra.
Пікірлер: 160