ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला… तर त्याच्या जवळच लागून असलेला कल्याण हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला…सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या नावावर 2014 ला खासदारकी पदरात पाडून घेतली. पण 2019 ची लोकसभा उजाडता श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं असं राजकारण उभं करत विकास कामांच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मोठ्या लीडने जिंकली. कल्याण आणि श्रीकांत शिंदे हे समीकरण त्यांनी असं काही बनवून ठेवलं की राजकारणाच्या कुठल्याही खेळ्या त्यांना कल्याण पासून वेगळं करू शकणार नव्हतं. म्हणूनच 2024 ला महायुतीकडून सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मागच्या दोन टर्म मध्ये आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री पदावर असल्यापासून श्रीकांत शिंदेंनी मतदारसंघात मोठा निधी आणत पैशांचा पाऊस पाडला. हीच डी फॉर डेव्हलपमेंटची लाईन मोठी करत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात असताना त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून कडवी झुंज देणारा एक मोठा चेहरा मैदानात आणला जाईल, असा सर्वांचाच अंदाज होता. म्हणूनच सुषमा अंधारे, वरुण देसाई अशा अनेक नावांचा विचार या जागेसाठी करण्यात येत होता. पण उद्धव ठाकरेंनी अगदी मोघपणे बोलताना कल्याणच्या उमेदवारीची घोषणा केली आणि सगळ्यांना धक्का बसला… कारण ठाकरेंनी दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेंच्या विरोधात एका सर्वसामान्य माजी नगरसेवकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. ते नाव म्हणजे वैशाली दरेकर. सुरुवातीला कल्याणच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात साटलोट झाल्याच्या बऱ्याच वावड्या उठल्या. ठाकरेंनी शिंदेंना फ्री चेंडू खेळायला दिला असाही आरोप झाला. पण मतदान अगदी तोंडावर आलेलं असताना ठाकरेंची डोकॅलिटी आता समोर येऊ लागलीय. श्रीकांत शिंदे यांचा गेम करण्यासाठीच वैशाली दरेकर हा साधा चेहरा ठाकरेंनी उमेदवार म्हणून पुढे केलाय. त्यामुळे भल्याभल्यांना जमलं नाही ते शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दरेकर करून दाखवणार? शिंदेंच्या कल्याणमधील वर्चस्वाला धक्का लावून वैशाली दरेकारांची मशाल पेटेल, असं आम्ही आत्मविश्वासाने का म्हणतोय? तेच पाहुयात आजच्या या व्हिडीओमध्ये.
Thane is the stronghold of Eknath Shinde, while neighboring Kalyan is dominated by his son, Shrikant Shinde. Shrikant, a two-term MP, initially took office in 2014 leveraging his father’s name. However, by the 2019 Lok Sabha elections, he secured his second term with a significant margin, establishing his own political foothold. Shrikant has solidified his position in Kalyan, making it nearly impossible for political opponents to challenge him. Consequently, he has been announced as the Mahayuti candidate for a third consecutive term in 2024.his tenure, especially after Eknath Shinde became Chief Minister, Shrikant Shinde has channeled substantial funds into his constituency, emphasizing development. As he prepares to run for MP again, there were expectations that Uddhav Thackeray would field a formidable candidate to challenge him. Names like Sushma Andhare and Varun Desai were speculated. In a surprising move, Thackeray announced the candidacy of Vaishali Darekar, a former corporator, against Shrikant Shinde. This announcement was unexpected, given Shrikant’s established political presence. Initially, rumors suggested a rift between Shinde and Thackeray over the Kalyan seat, with accusations that Thackeray was giving Shinde a free pass. However, with elections approaching, Thackeray's strategy became clear. Vaishali Darekar, though relatively unknown, is Thackeray's choice to challenge Shrikant Shinde. The question arises whether an unassuming candidate like Darekar can disrupt Shinde's dominance in Kalyan. Today’s video will explore why Thackeray is confident that Darekar’s campaign can ignite a challenge to Shinde’s hegemony in Kalyan.
#eknathshinde #shrikantshinde #kalyanloksabha #vaishalidarekar #shindevsthackeray #breakingnews #marathi #hellomaharashtra
keywords:
Kalyan Lok Sabha election
Kalyan Lok Sabha candidates
Kalyan Lok Sabha result
Kalyan Lok Sabha debate
Kalyan Lok Sabha 2024
Kalyan Lok Sabha live stream
Kalyan Lok Sabha voting process
Kalyan Lok Sabha winner
Kalyan Lok Sabha opinion polls
Kalyan Lok Sabha analysis
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : /@hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : /hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : /hellomaharashtra.in
#kalyanloksabha #eknathshinde #shrikantshinde #sushmaandhare #varunsarnaik #devendrafadanvis #bjp #shivsena #ubhata #vaishalidarekar #beedloksabha #livemarathinews #loksabhaelection2024 #loksabhaelections2024 #loksabhaelection #loksabha #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #prakashambedkar #devendrafadnavis #eknathshinde #electionresult #sharadpawarvsajitpawar #supriyasulevsajitpawar #marathinews #maharashtranewsliveupdates #marathinewslive #livemarathinews #marathinewsvideo #marathinewsupdates #marathibreakingnews #marathinewstoday #marathareservationsurvey #marathibatmya #marathibatmyalive #batmyamarathilivetoday #mumbailoksabha #thaneloksabha #sushmandharebhashan
Негізгі бет Kalyan Lok Sabha : Shrikant Shinde यांना बालेकिल्ल्यातच धक्का, मशाल आघाडीवर, Vaishali Darekar
Пікірлер: 1,2 М.