राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२१ पासून सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासन वित्त विभाग याच्या मार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
••शासन निर्णय क्रमांक: मभवा-२०१९/प्र.क्र. ३०/ सेवा-९
• मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२
दिनांक ७ ऑक्टोबर, २०२१
वाचा १. शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३१९/ प्र. क्र. ३०/ सेवा-९.
दिनांक : ४ जानेवारी, २०२०
२. भारत सरकार, वित्त मंत्रालय व्यय विभाग आदेश क्रमांक १/१
/ २०२० - इ.। (बी). दिनांक २० जुलै, २०२१
शासन निर्णय
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% • करण्यात यावा. सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२०, दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ 9% इतकाच राहील. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी.
दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
8. •यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात याचा अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
Негізгі бет कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट? महागाई भत्ता वाढला? या महिन्यापासून मिळणार रोख? फरक कधी?
Пікірлер: 28