खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan) प्रांजू प्रदनु आणि वर्षा मामाच्या गावी चार पाच दिवस राहायला गेले होते. साखरी मंडणगड हे माझे सासरोडचे गाव आहे. मामाच्या गावी राहायला गेल्यावर प्रांजू प्रदनु जाम खुश होतात. यावेळेस मामाची गाय व्यायली तर दूध खूप होता. पोरांनी मजा केली. मी आणि सकाळी लवकर मामाच्या गावी माझ्या आजोळी खारी गावी निघालो. माझे आंबवली गाव, खारी माझे आजोळ आणि सासरोड साखरी गाव ही गावं अगदी जवळ जवळ आहेत. सकाळी खरी गावी गेल्यावर की खाडीत खेकडी पकडायला गेलो होतो. खाडीतून पगोलीने खेकडी पकडली. दिवसभर पाऊस लागत होता. मी पूर्ण भिजलो होतो. खेकडी पकडायला जाम मजा येते. दुपारी मी साखरी गावी पोरांना आणायला गेलो. वर्षाने दुपारी जेवणात अंड्याचं कालवण बनवलं होतं. जेवण खूप चविष्ट बनवलं होतं. प्रांजू प्रदनु मामाकडून घरी यायला तयार नव्हते. आम्ही साखरीवरून घरी यायला निघालो. वर्षाची आई, मामी सोडायला गाडीजवळ आले होते. आम्ही पुन्हा साखरी शेतीची कामे करायला जाऊ असे सांगितले. घरी येऊन वर्षाने खेकड्यांचा रस्सा घातला. गावी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वातावरणात रस्सा प्यायची मजा काही औरच. आई घरी आल्यावर आम्ही सर्वांनी रात्रीचे एकत्र जेवण केले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मामाच्या गावी जाऊन खेकडी पकडली ते दाखवले आहे. पोरांना आणायला सासरोडी गेलो ते आणि संध्याकाळी घरी आल्यावर खेकड्यांचा रस्सा दाखवला आहे. या व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhadichiKhekdi #MudCrabCatching #KhekdyachaRassa #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan)
Пікірлер: 436