|| खोचीवडा कोळीवाड्यात पारंपारिक वेशात होते देवीची पूजाअर्चा || भवानी माता || @KoliyacheBol
.
.
.
.
.
.
.नायगाव पश्चिमेला असलेला खोचीवडा कोळीवाडा...
वसई किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.. न जाणो वसई मोहिमेत चिमाजी अप्पांचे सैन्य गोखीवर्यारुन येताना वसई किल्ल्याकडे जाताना त्यांना जी दलदल लागली.. त्या दलदळीतून जाताना या कोळीवाड्यांनी नक्कीच योगदान दिलं असेल... कारण २०५ वर्षांच्या पोर्तुगीजांच्या जुलमी धर्मांध राज्यसत्तेपुढे आपला देव देश धर्म टिकवणे साधी गोष्ट नव्हती...
देव देश धर्म ... जपण्यासाठी कोळी बांधव सदैव अग्रेसर राहिला आहे..
आजही या खोचीवडा कोळीवाड्यात एका घरात भवानी देवीचं टाकं पूजलं जातं .. मासेमारीसाठी निघत असताना भवानी देवीकडे कौल मागितला जातो.. बोट माशांनी भरून आली.. की माशांचा नैवेद्य या देवीला दाखवला जातो..
या कोळीवाड्यातील एक ७५ वर्षाच्या आज्जी.. तुमचं माहेर वरळी कोळीवाड्यातील... पण त्यांनी जेव्हा सांगितलं की मी शिक्षिका म्हणून रिटायर्ड झालेली आहे.. हे माझ्यासाठी कमी आश्चर्याचं नव्हतं... तसेच या भवानी देवीची नित्यनेमाने पूजा करणाऱ्या काकी एसबीआय मधून मॅनेजर पदावरून रिटायर्ड झालेल्या आहेत..
नवरात्रीनिमित्त या मूळ देवीची प्रतिकृती म्हणून भवानी देवीचा जागर केला जातो..या काकिंची मुलगी थेट अमेरिकेतून व्हिडिओ कॉलद्वारे या महाआरती सामील होते...
मुळात या गावातील नोकरी व्यवसायानिमित्त सातासमुद्रापार गेलेले नागरिक... आपल्या संस्कृतीशी नाळ कायम ठेवून आहे..
आपल्या पुढच्या पिढीपर्यंत वारसा पोहोचावा.. म्हणून इथे पारंपारिक वेशात देवीचा जागर केला जातो... हे भावलं..
.. या देवीचे दर्शनात होतो आम्हाला अर्नाळातील माहेर भाषेत असलेल्या वैशाली ताई यांच्यामुळे मिळाला....
या जागरा निमित्त आम्हाला ची आरती ची संधी मिळाली.. अगदी सुश्राव्य.. नारद तुंबरुही साम गायन करी... या आरतीतील अंतर्याची आठवण करून देणारी..
अगदी शपथेवार सांगतो... तालासुरात सुरू असलेली आरती... मी आजपर्यंत कुठल्या देवस्थानातही पहिली नाही..
... हा पारंपारिक वेशातील जागर आपणास... कोळी समाजाची सनातन संस्कृती.
.
.
.
.
.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
.
. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.
.
.
चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
.
.
.
.
.
सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा.
.
.
.
Instagram link 🖇️
/ koliyachebol
फेसबुक link 🖇️
/ koliyachebol
.
..
.
Негізгі бет || खोचीवडा कोळीवाड्यात पारंपारिक वेशात होते देवीची पूजाअर्चा || भवानी माता ||
Пікірлер: 17