लेपा माशाचा रस्सा आणि सुक्का 😍 | मच्छि साफ करून घातली - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणातल्या गावी मासे खाण्याची मजा खूप असते. आम्ही गावी गेलो की वेगवेगळ्या प्रकारचे मासे गावात विक्रीला येतात. समुद्रातील आलेले ताजे मासे आमच्या गावात विक्रीला आल्यावर सगळे जण मासे खरेदी करतात. त्यामध्ये बांगडा, लेपा, सुरमई, पापलेट, डोमा, मांदेली असे मासे असतात आज आमच्या घरी लेपा मासे खरेदी केले होते. लेपा मासे कसे साफ करतात हे आईने दाखवले आहे. लेपा माशाचं कालवण रस्सा आणि सुका अतिशय छान बनतो. आईने या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेपा माशाचा रस्सा दाखवला आहे. आईने या व्हिडिओमध्ये लेप माशाचा रस्सा आणि सुक्का दाखवला आहे. लेपा मासे साफ करून झाल्यावर त्यांना स्वच्छ धुऊन घ्यायचे. कोकणी गावरान पद्धतीने माशांचे कालवण कसे घालायचा हे आईने दाखवले आहे. प्रांजू प्रसनु मासे आई कसे साफ करते ते बघायला आले होते. आईने लेपा मशाचा रस्सा अतिशय छान बनवला. कांदा आणि लसणाच्या फोडणी मध्ये लेपा माशाचा सुका सुद्धा बनवला. रात्री आम्ही सगळे जण जेवायला एकत्र बसतो. कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या थंडगार वातावरणात अशा प्रकारचे जेवण मिळणं किती सुखद आहे. आईने बनवलेले लेपा माशाचा रस्सा अतिशय चविष्ट झाला होता. सुका तर विचारूच नका एवढा भारी झाला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आईने लेपा माशाचा मच्छी साफ कशी केली ते दाखवला आहे. लेप माशाचा रस्सा आणि सुक्का दाखवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#LepaFishRassa #LepaFishCurry #FishRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatish_official
Негізгі бет लेपा माशाचा रस्सा आणि सुक्का 😍 | मच्छि साफ करून घातली - Ambavali, Mandangad (Konkan)
Пікірлер: 389