माझ्या वाढदिवसाला आईने असे दिले गिफ्ट 😍 | कोंबडी वडे आणि चुलीवरचे चिकन - Ambavali, Mandangad (Konkan) माझा वाढदिवस 12 मे या दिवशी असतो. दरवर्षी मी या दिवशी गावी असतो. माझा वाढदिवस गावी प्रथमच साजरा केला. आम्ही सकाळी आई आणि प्रदनु केळशी बाजारपेठेत गेलो. केळशी बाजारपेठेत खरेदी करून पुन्हा घरी आलो. येताना ब्रॉयलर कोंबडी खरेदी केली. घरी येऊन वर्षाने चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवला. कोंबडी वडे सुद्धा बनवले. कोंबडी वडे यांना भोकाचे वडे आणि पोल्या असे सुद्धा बोलतात. कोंबडी वडे याचे पीठ कसे ठेवतात हे वर्षाने सांगितले आहे. दुपारी आम्ही जेवण तयार करायला सुरुवात केली. वाढदिवस आम्ही रात्री साजरा साजरा करणार होतो. गावी केक मिळत नसल्यामुळे वर्षाने केक घरीच बनवला. बिस्किटपासून वर्षाने झटपट केक तयार केला.चीकन सुक्का आणि चिकन रस्सा आम्ही बनवून घेतला. आम्ही चुलीवर कसा चिकन सुक्का घातला आहे ते दाखवले आहे. चिकन रस्सा सुद्धा जाम भारी झाला होता. प्रांजु प्रदनु पप्पाचा वाढदिवस आहे म्हणून दोघे खुश होते. आईकडून मला वाढदिवसाला खास गिफ्ट मिळाले. आम्ही केक कापून वाढदिवस साजरा केला. रात्रीचे पंगतीने सर्वांनी जेवण केले. कोंबडी वडे, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा अतिशय छान बनला होता. सर्वजण आम्ही पोटभर जेवलो. आमच्या शेजारी मित्रांना निमंत्रण दिले होते. जेवण झाल्यावर आम्ही आईसोबत गप्पा केल्या. आई आता एकदम बरी झाली आहे. आईसोबत आम्ही एकत्र राहायला आलो म्हणून आम्ही सगळेजण एकदम खुश होतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा गावी साजरा केलेला वाढदिवस आणि गावी चुलीवर बनवलेलं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#ChickenSukka #SforsatishBirthday #KombadiVade #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет माझ्या वाढदिवसाला आईने असे दिले गिफ्ट 😍 | कोंबडी वडे आणि चुलीवरचे चिकन - Ambavali, Mandangad(Konkan)
Пікірлер: 1,5 М.