Mahad Mahapur 2021/ महाड रायगड महापुरानंतर विदारक परिस्थिती जुलै २०२१
गुरुवारी रात्री झालेली अतिवृष्टी व महाबळेश्वर डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे महाड तालुक्यातील तळीये तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे दरडी कोसळून सुमारे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तळीये येथे दरडीखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे तर केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे काही घरे दरडी सोबत वाहत गेली आहेत. केवनाळे व सुतार वाडी येथे २१ जण जखमी आहेत. (Landslide in Mahad, Poladpur of Raigad district)
महाड तालुक्यातील तळीये या गावात सायंकाळी दरड कोसळल्यामुळे गावातील घरे दरडीखाली दबली गेली. आज दरडी खालून ३६ मृतदेह काढण्यात आले आहेत तर सुमारे ४० जण दरडीखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच महाबळेश्वर व वरंधा घाट डोंगर भागातील पावसाच्या पाण्याचा लोंढा महाड तालुक्यात आल्याने महाड शहरासह परिसरात परिसरातील गावांमध्ये पूर आला. तळीये हे गाव डोंगरकपारीत वसलेले असल्याने गावातील घरे दराडीच्या खाली दबली गेली. तळीये हे गाव सुमारे ३५ घरांचे असून गावातील लोकसंख्या ८०० च्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. अतिवृष्टीमुळे या भागातील वीज पुरवठा बंद होता तर पुराचे पाणी सर्वत्र पसरल्याने गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचा माग काढणे देखील अवघड होते. यामुळे या भागात तातडीने बचाव पथक वा मदत पोहोचू शकली नाही. गावातील एक दोन घरे सोडली तर उर्वरित घरांचे बांधकाम कच्चे आहे. सामान्य मजूर व शेतकऱ्यांची वस्ती असलेल्या या गावातील निष्पाप जीवाचा अतिवृष्टीने बळी घेतला असून कालपर्यंत अस्तित्वात असलेल्या या गावाला स्मशानकळा आली आहे.
Негізгі бет Mahad Mahapur 2021 / महाड रायगड महापुरानंतर विदारक परिस्थिती जुलै २०२१
Пікірлер: 2