दि.०८.०७.२०२४ :
मुंबई आणि कोकणासह कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत काल रात्री एक वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंतच्या सहा तासांत विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
----सिंक ---.
सुनील कांबळे, संचालक . हवामान विभाग, मुंबई.
मुंबईत रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता मात्र आता बऱ्याच ठिकाणी पावसाला उतार पडल्यानं आणि पाण्याचा निचरा होऊ लागल्यानं स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. रात्रीपासून झालेल्या पावसानं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकांदरम्यानची काही काळासाठी ठप्प झालेली जलदगती रेल्वे सेवा आता धीम्या गतीनं सुरु झाली आहे. तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील हळूहळू मार्गस्थ होत आहेत.
दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेच्या गाड्या १० मिनिटं उशीरा धावत आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप वापरले जात असून रेल्वे कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईत सायन, कुर्ला, विद्याविहार, दादर तसंच अंधेरी या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. पश्चिम द्रुतगती महामार्गावरही विलेपार्ले आणि अंधेरी इथं वाहतुकीची कोंडी झाली आहे.
मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबई महानगर पालिकेच्या तसंच सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठानं दूरस्थ शिक्षण अर्थात बहि:शाल विभागाच्या आज सकाळच्या सत्रात ११ ते २ या कालावधीतल्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा आता १३ जुलै रोजी होणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे.
मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्याचप्रमाणे पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी, इंद्रायणी एक्स्प्रेस आणि सिंहगड या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.
अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या ८ तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. ठाणे, वसई, घाटकोपर, कुर्ला, महाड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा इथं ही पथकं तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय अंधेरी इथं ३ आणि नागपुरातही एक पथक कर्तव्य बजावत आहे.
Official KZitem channel of DD Sahyadri News
Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.
DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
KZitem -- / @ddsahyadrinews
Twitter -- / ddsahyadrinews
Instagram -- / ddsahyadrinews
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray
Негізгі бет मुंबईत सकाळी ७ वाजेपर्यंत विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद.
Пікірлер: 2