ज्ञानयोग ध्यान शिबीर
जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे ज्ञानयोग..
मनःशांती,समाधान,आत्मिक आनंद, आरोग्य, व निखळ प्रेम म्हणजे ज्ञानयोग..
सकारात्मक जीवनशैली, विचार शुध्दी व आहारातून आरोग्याकडे नेणारे प्रात्यक्षिक म्हणजे ज्ञानयोग..
माऊलीजींच्या सोबत चैतन्य वनातील सहा दिवस निवासी शिबिरात सर्व साधक आपले वय विसरून,आपले पद, प्रतिष्ठा, रोग, तणाव हे सर्व विसरून एका परमेश्वरी सानिध्यात असल्याची अनुभूती घेतात,
त्यांना जीवनशैली, आहार व विचारांमध्ये सकारात्मक बदल केला तर गोळ्या औषधांशिवाय आपण जगू शकतो, कारणाशिवाय आनंदात राहू शकतो, प्रत्येकासोबत आपण छान हसत खेळत संवाद करू शकतो, संकटांना हसत हसत सामोरे जाऊ शकतो, ही अनुभूती येते.
ज्या परमेश्वराला आपण मंदिरात मूर्तीत पाहतो तो परमात्मा, ती परमेश्वराची ऊर्जा आपल्या स्वतःत व आपल्या आजूबाजूला
सतत 24 तास आहे अशी अनुभूती येते.
आपल्याला प्रत्येक काम करताना आनंद मिळतो,
प्रत्येक कामात आपल्याला यश येते, घरामधील एकमेकांचे नातेसंबंध सुधारतात,
एकमेकांशी प्रेमभाव ठेवून सर्वांनी वागल्यामुळे घराचे गोकुळ होते, नंदनवन होते,
ध्यान,प्राणायाम, निसर्गाशी संवाद, शरीरशुद्धीच्या वेगवेगळ्या क्रिया, हसणे, खेळणे, रडणे, नाचणे, गाणे यातून मनातील सर्व कचरा साफ होतो. शरीराची शुद्धी होते. शरीर-मन एकत्र येते.हरवलेले आरोग्य प्राप्त होते. विचारशून्य अवस्था येते. विदेही अवस्थेतून परमेश्वर प्राप्तीची अनुभूती येते. चेहऱ्यावरचे तेज वाढते. असे अनेक फायदे या शिबिरातून हजारो साधकांना अनुभवायला मिळतात.
आपण सर्वच नेहमी म्हणत असतो की बालपण देगा देवा..
पण माऊलीजिच्या सानिध्यात आलं की ते निरागस बालपण ती चैतन्य शक्ती आपोआप आपल्याला अनुभवता येते.
50 देशातील 10 कोटी पेक्षाही अधिक साधक माऊलींच्या विचारांसोबत जोडल्या गेलेले आहेत. सकाळची झूम साधना,युट्युब,फेसबुक, इन्स्टाग्राम आणि निसर्गरम्य चैतन्य वनातील वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून करोडो लोक या अद्भुत ऊर्जेची अनुभूती घेत आहेत.
आपणही सहभागी व्हा आणि अनुभव घ्या.
9834121929 9021532157
Негізгі бет #टेन्शनमुक्त_होण्याचे_तीन_सोपे_मंत्र
Пікірлер: 371