@FarmofHappiness
नमस्कार मंडळी,
'आनंदाच्या शेतातला' "कला मोहोर" हा अगदी वेगळा उपक्रम आहे.
"कलामोहोर... कलेचा आनंद, कलाकाराच्या सान्निध्यात!" या शब्दांतच या नव्या संकल्पनेचा अर्थ सामावलेला आहे.
'आनंदाचं शेत' म्हणजेच पर्यटकांचं आवडतं 'फार्म ऑफ हॅपिनेस' हे कोकणातलं निसर्गसिद्ध आणि अत्यंत दर्जेदार कृषिपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण.
वसंत ऋतूत मोहोरानं फुललेल्या आंब्या काजूच्या बागेत "कलांचा मोहोर"ही फ़ुलावा हा "कलामोहोर" या संकल्पनेचा हेतू.
२०२३ मधल्या दुसऱ्या वर्षीच्या 'कलामोहोर'च्या मध्ये आम्ही आमंत्रित केलं होतं, प्रख्यात शिल्पकार श्री भगवान रामपुरे यांना.
आणि त्यांच्याबरोबर आनंदाच्या शेतात राहुन, त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी अनुभवायला सहभागी झाले होते काही मोजके रसिक पर्यटक पाहुणे.
संगीत, नृत्य, वादन यांसारखी सादरीकरणाची नसलेली शिल्पकला! तरीही तीन दिवस रसिक पर्यटक पाहुण्यांना खिळवून ठेवण्याची अवघड गोष्ट साधली ते रामपुरे सरांसारख्या कसबी, अनुभवी शिल्पकारानं दिलेल्या शिल्प सादरीकरणानं. त्यांच्याख्या कलाकाराच्या सान्निध्यात राहून, म्हणजे एकाच घरात, अंगणात, बागेत, शेतात त्याच्या बरोबर जो अनुभव या पाहुण्यांना मिळाला... तो व्हिडिओतून मांडणं केवळ अशक्य! पण तरीही हा छोटासा व्हिडिओ, 'कलामोहोर' सारख्या आगळ्या वेगळ्या पर्यटन संकल्पनेची अनुभूती देण्याचा प्रयत्न!
Hello friends,
"Kala Mohor" is a completely different event at 'Farm of Happiness'.
"Kalamohor... in company of the artist and the art!!" The words of the tagline contain the meaning of this unique concept.
'Anandache Shet' i.e. 'Farm of Happiness' is a popular tourist destination in Konkan for its natural and high quality Agro Tourism.
In "Kalamohor", we invite a renowned artist for a stay at Farm of Happiness. Traveler guests, get an opportunity to stay at Farm of Happiness along with these artists and get an up-close experience of their arts.
In April 2023, for the 2nd year of the event 'Kalamohor', we invited renowned sculptor Bhagwan Rampure. And the art loving travellers joined us to experience his company for three days at the Home/Farm stay here.
It is just not possible to recreate the experience here through this video. Yet it is just an effort to give you a glimpse and taste of the experience, in the words of the traveller guests!
Негізгі бет आनंदाच्या शेतात "कलामोहोर २०२३" मध्ये शिल्पकार भगवान रामपुरे @ Farm of Happiness Agro Tourism
No video
Пікірлер: 15