@farmofhappinessagrotourism 'शेती करणं म्हणजे फक्त अन्न किंवा पीक उगवणं इतकंच नसून मुळात अन्न आणि आपलं अन्न उगवायला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या घटकांना समजून घेणंही आहे आणि त्या सगळ्या घटकांना पूरक अशी जीवनशैली जगणं आहे' असं आम्हाला वाटतं. ऍग्री 'कल्चर' म्हणजे शेती 'संस्कृती!' आणि संस्कृतीचा अर्थ फक्त पाककृती, सण, पूजा, कार्यक्रम रांगोळ्या, वेष इतकाच नसून खूप खोल आणि विस्तृत आहे. या सगळ्या गोष्टी तर हिमनगाच्या वरच्या टोकासारख्या फक्त सहज दिसणाऱ्या आहेत. पण त्यांचा पाया खूप खोल आणि विस्तारित अशा विज्ञानावर आधारित आहे. अशा विज्ञानावर, जे निसर्ग निष्ठ किंवा मुळातच निसर्गनिर्मित आहे. या विज्ञानाचा, निसर्गाला हरवण्याचा किंवा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा अट्टाहास नाही. आनंदाचं शेत म्हणजे "फार्म हाऊस नाही" तर तो शेतीवर आधारित जीवनपद्धती (लाईफस्टाईल!) जगण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथल्या आमच्या घरात शेणाने सारवलेली जमीन, संध्याकाळची गोवऱ्यांची धुरी हे वरवर पाहता केवळ "नाॅस्टॅल्जिक एलिमेंट्स" वाटत असले तरी हे जगणं अत्यंत वास्तववादी, प्रॅक्टिकलही आहे...अगदी आजसुद्धा! या नुसत्या संस्कृती जतनाच्या भावना नाहीत. इथला गोकुळासारखा गोठा म्हणजे बारा महिने तेरा काळ दूध पुरवठा करणारा डेअरी व्यवसाय नाही. इथे दुध, दही, लोणी, श्रीखंडाइतकंच... किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्व आहे शेणा-मुताला! त्यातून मातीचं जैविक पोषण होण्याला. गाई-गुरांसह, मधमाश्यां-फुलपाखरांसह जगण्याचं हे सहजीवन असं दहा - बारा मिनीटांत व्हडिओमधून मांडणं केवळ अशक्य आहे... ती प्रत्यक्ष अनुभवायची बाब आहे. आणि त्या अनुभवांत अनेकांना सामील करून घेण्यासाठी कृषीपर्यटन राबवतोय. 'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या या बाराव्या भागात आम्ही तुम्हाला सामिल करून घेत आहोत आमच्या शेतातल्या गोधनाची पुजा करायला, तेही आज दिवाळीतल्या वसूबारसेच्या दिवशी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा अनूभव घ्याल तसाच, प्रत्यक्षातही "हा अनुभव घ्यायलाच हवा!" असाच आहे. येताय ना तुम्ही?
Негізгі бет शेती सध्या काय करते? भाग १२ - वसुबारसेची गोधनपुजा
Пікірлер: 137