#BolBhidu #ChhaganBhujbal #Rajyasabha
नाशिक लोकसभेनंतर राज्यसभेवरूनही छगन भुजबळांचा पत्ता कट झालाय. ज्येष्ठतेचा मुद्दा लक्षात घेतला, तर राज्यसभेची जागा भुजबळांना मिळेल अशी चर्चा होती. पण तसं घडलं नाही, सुनेत्रा पवारांची वर्णी लागली. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सुद्धा भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना केली. त्यानंतरच छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली, अगदी पत्रकारांनीही भुजबळांना याबद्दल प्रश्न विचारला. स्वत: भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली, 'पक्षात काम करताना सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काही वेळा थांबावं लागतं,' असं ते म्हणाले. त्यांनी असं वक्तव्य करत सामंजस्याची भूमिका घेतली असली तरी, पक्षात त्यांना डावललं जात असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याच आशयाचं एक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनाही सातत्यानं भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. पण ना फोटो, भाषण ते उमेदवारी भुजबळांना डावललं का जातंय ? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Nashik Loksabha नंतर Rajyasabha मध्येही पत्ता कट, महायुतीत Chhagan Bhujbal यांना का डावललं जातंय?
Пікірлер: 456