नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai) पनवेलपासून अगदी जवळ असलेलं हे कामोठे फिश मार्केट ताज्या आणि स्वस्त माशांसाठी आता लोकप्रिय आहे. कामोठे फिश मार्केटमध्ये मासे अतिशय स्वस्त मिळतात. मी आणि माझा भाऊ दोघे कामोठे फिश मार्केटला भेट द्यायला गेलो होतो. कामोठे फिश मार्केटचे खरे नाव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मच्छी मार्केट असे आहे. हे फिश मार्केट दिवसभर चालू असते. फक्त दुपारी दोन ते चार मार्केट बंद असते. सकाळी आठ वाजता हे मार्केट उघडते आणि रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट चालू असते. सायन पनवेल रोडपासून अगदी जवळ कामोठे फिश मार्केट आहे. कामोठे फिश मार्केटला जवळचे रेल्वे स्टेशन मानसरोवर आहे. या मासळी बाजारात मासे उरण, अलिबाग, भाऊचा धक्का आणि कुलाबा येथून येतात. या मार्केटमधील सर्व मासे विक्री करणाऱ्या महिला प्रेमळ आहेत. माशांचे भाव अतिशय स्वस्त आहेत. आपण इथे माशांचे भाव कमी सुद्धा करू शकतो. हे मासळी बाजार पक्के नसले तरी इथे सर्वांनी एकत्र येऊन शेड बांधले आहे. इथे खाऱ्या पाण्याचे आणि गोड्या पाण्याचे असे दोन्ही प्रकारचे मासे खरेदी करता येतात. सुरमई, हलवा, पापलेट, कोलंबी, वाकटी, बांगडा, पाकट, खेकडे असे नाना प्रकारचे मासे विक्रीला असतात. गोड्या पाण्याच्या मासळीमध्ये रोहू, कटला, हलवा, वाव, असे मासे विक्रीला असतात. #KamotheFishMarket #KamotheNaviMumbai #FishMarketInNaviMumbai #sforsatish
कामोठे फिश मार्केटमध्ये सुकी मच्छि सुद्धा खरेदी करता येते. आम्ही काही सुकी मच्छि सुद्धा खरेदी केली त्याचा व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहे. या मासळी बाजारातील मासे विक्री करणाऱ्या महिलांची एक मागणी आहे की त्यांना एक पक्कं मासळी बाजार बांधून द्यावे. सध्या येथे ताडपत्री आणि बाबूंनी शेड तयार केलेले आहे. कामोठे फिश मार्केटच्या बाजूलाच भाजी मंडई सुद्धा आहे. अतिशय स्वस्त आणि ताजी भाजी येथे खरेदी करता येते. कपड्यांची दुकाने सुद्धा या मंडईमध्ये आहेत. आम्ही हलवा मासे खरेदी केले. बारीक कोलीम खरेदी केली. आपल्या चॅनलचे सगळे सबस्क्राईबर या सगळ्या महिला आहेत. आपले खास करून सगळे व्हिडीओ बघत असतात. या बाजारात चिकन आणि मटण शॉप सुद्धा आहेत. रविवारच्या दिवशी या बाजारात खूप गर्दी असते. बुधवार, शुक्रवार रविवार या दिवशी मासे जास्त असतात. कामोठे फिश मार्केट जरी छोटे असले तरी टापटीप आहे. येथील सर्व महिला सर्वांशी प्रेमाने बोलतात. कधी आलात नवी मुंबईत तर कामोठे फिश मार्केटला जरूर भेट द्या. सुरमई, पापलेट, हलवा, सरगा, बंगडा असे नाना प्रकारचे मासे खरेदी करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कामोठे फिश मार्केट दाखवले आहे. फिश मार्केटचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरुर करा.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)
Пікірлер: 295